ताज्या बातम्या

कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे दसरा चौकात ठिय्या आंदोलन

Thiya andolan


By nisha patil - 7/24/2025 3:37:59 PM
Share This News:



कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे दसरा चौकात ठिय्या आंदोलन

 सरकारच्या दिरंगाईविरोधात प्रहारचा चक्काजाम

शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या सरकारने आता त्या वचनाची अंमलबजावणी करण्यास विलंब करत असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज कोल्हापुरात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. बँक अधिकारी कर्जवसुलीसाठी तगादा लावत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी यापूर्वी विविध आंदोलनांद्वारे सरकारचे लक्ष वेधले होते. मात्र, सरकारने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आज राज्यभर प्रहार संघटनेतर्फे चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

कोल्हापुरात दसरा चौक व जोतिबा रोड परिसरात हे आंदोलन झाले. यावेळी प्रहार संघटनेचे समाधान हेगडकर, देवदत्त माने, आशिष शिंदे, विकास चौगुले, जयश्री शिंदे, आस्मा स्वार, मयुर वरुटे, विकास गायकवाड आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे दसरा चौकात ठिय्या आंदोलन
Total Views: 92