राजकीय

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक आझाद मैदानावर जाणार : आमदार राजेश क्षीरसागर

Thousands of Shiv Sena supporters


By nisha patil - 9/29/2025 3:57:07 PM
Share This News:



शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक आझाद मैदानावर जाणार : आमदार राजेश क्षीरसागर
 

कोल्हापुरातून सर्वाधिक शिवसैनिकांची उपस्थिती लक्षणीय ठरणार

कोल्हापूर दि. २९ : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना न्याय देण्यासाठी आणि उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या कार्याला बळ देण्यासाठी २ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.

शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे झालेल्या आढावा बैठकीत आमदार क्षीरसागर म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व शिवसैनिकांनी संघटनेची ताकद वाढवावी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जनतेसाठी झालेले विकासकामे मतदारांपर्यंत पोचवावीत. महिलांशी संपर्क वाढवण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवावेत. स्थानिक हेवे-दावे बाजूला ठेवून धनुष्यबाण हाच उमेदवार समजून निवडणुकीसाठी एकजूट करावी, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार क्षीरसागर पुढे म्हणाले की, दसरा मेळाव्यास हजेरी लावण्याचे हे माझे ४०वे वर्ष आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना न्याय देणारे नेतृत्व शिंदे साहेबांच्या रूपाने मिळाले आहे. आझाद मैदानावर होणाऱ्या मेळाव्यास कोल्हापुरातून सर्वाधिक शिवसैनिकांची उपस्थिती लक्षणीय ठरणार आहे.

यावेळी शिवसेना उपनेत्या माजी आमदार जयश्री जाधव यांनी कार्यकर्त्यांना प्रेरणा देत सांगितले की, प्रत्येकाने आपणच निवडणूक लढत आहोत या भावनेने काम केले पाहिजे. तिकीट ज्याला मिळेल त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी सज्ज व्हा.

या बैठकीस माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शुभांगी पवार, शहरप्रमुख अमरजा पाटील, तसेच विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक आझाद मैदानावर जाणार : आमदार राजेश क्षीरसागर
Total Views: 64