बातम्या

कागल तालुक्यातून हजारो कार्यकर्ते कोल्हापूरच्या संघर्ष महामोर्चात सहभागी होणार: प्रकाश गाडेकर 

Thousands of activists from Kagal taluka will participate in Kolhapur


By Administrator - 7/3/2026 6:20:52 PM
Share This News:



कागल तालुक्यातून हजारो कार्यकर्ते कोल्हापूरच्या संघर्ष महामोर्चात सहभागी होणार: प्रकाश गाडेकर 

स्वप्निल गोरंबेकर कागल (प्रतिनिधी) – अनुसूचित जाती (SC) आरक्षण बचावासाठी आणि खोट्या जात प्रमाणपत्रांद्वारे आरक्षणाचा गैरवापर करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात अनुसूचित जाती आरक्षण जनआंदोलन समितीच्या वतीने ९ मार्च रोजी कोल्हापूर येथे भव्य संघर्ष महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चात कागल तालुक्यातून हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी दिली.

या पार्श्वभूमीवर कागल येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून महामोर्चाच्या नियोजनावर चर्चा केली. या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे (दादा) यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, अनुसूचित जातीच्या आरक्षणावर डोळा ठेवणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात आता सर्वांनी एकजुटीने उभे राहणे अत्यंत गरजेचे आहे. आरक्षण हा अनुसूचित जाती समाजाचा घटनात्मक हक्क असून त्यावर कुठल्याही प्रकारे गदा येऊ देणार नाही. त्यामुळे ९ मार्च रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या भव्य संघर्ष महामोर्चाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीत अजित कांबळे (माजी नगराध्यक्ष), दलित मित्र बळवंत माने, माजी नगरसेवक विवेक लोटे, संजय हेगडे, गणेश कांबळे, भगवान कांबळे, रवी कांबळे, प्रवीण करनेक, राहुल गाडेकर, सचिन मोहिते, रमेश कांबळे, सुरज कामत, बच्चन कांबळे, उत्तम वंदुरकर, सागर शिंदे, डी. एस. कांबळे, सी. बी. कांबळे, सुरेश लोखंडे आदींनी मार्गदर्शन केले.

यावेळी ९ मार्च रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या संघर्ष महामोर्चात कागल तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होण्यासाठी गावागावांत जनजागृती करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. बैठकीस मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


कागल तालुक्यातून हजारो कार्यकर्ते कोल्हापूरच्या संघर्ष महामोर्चात सहभागी होणार: प्रकाश गाडेकर 
Total Views: 8