विशेष बातम्या

महापुराचा धोका! शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी अंबाबाईला साकडे

Threat of major floods

By nisha patil - 10/7/2025 10:27:41 PM
Share This News:

महापुराचा धोका! शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी अंबाबाईला साकडे

कोल्हापूर | शक्तिपीठ महामार्गामुळे कोल्हापूर शहर आणि परिसराला महापुराचा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे हा महामार्ग विनाशाकडे नेणारा असून, तो त्वरित रद्द व्हावा, अशी मागणी इंडिया आघाडीने केली आहे.

यासंदर्भात शुक्रवार, 11 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजता भवानी मंडप येथील श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी साकडे घालण्यात येणार आहे.

पत्रकार, छायाचित्रकार बंधूंनी यासाठी उपस्थित राहून वार्तांकन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

📍 स्थळ: श्री अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, कोल्हापूर
🕛 वेळ: शुक्रवार, 11 जुलै 2025 | दुपारी 12.00 वाजता

महापुराचा धोका! शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी अंबाबाईला साकडे
Total Views: 169