बातम्या
अमिताभ बच्चन यांचा जलसा बॉम्बने उडवण्याची धमकी; मुंबईत खळबळ!
By Administrator - 6/11/2026 4:53:40 PM
Share This News:
अमिताभ बच्चन यांचा जलसा बॉम्बने उडवण्याची धमकी; मुंबईत खळबळ!
मुंबईतून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील 'जलसा' बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाला एक धमकीचा ई-मेल प्राप्त झाला आहे. या ई-मेलमध्ये केवळ मुंबई उच्च न्यायालयच नव्हे, तर मुंबई शेअर बाजार अर्थात BSE, वरळी रेसकोर्स आणि अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यालाही बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.
या धमकीच्या ई-मेलनंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. धमकीचा ई-मेल नेमका कुठून पाठवण्यात आला? यामागे कोणाचा हात आहे? तसेच धमकी कितपत गंभीर आहे? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, मुंबईतील महत्त्वाची ठिकाणे आणि अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याला धमकी मिळाल्याने सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता या धमकीमागील सूत्रधार कोण, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.
अमिताभ बच्चन यांचा जलसा बॉम्बने उडवण्याची धमकी; मुंबईत खळबळ!
|