ताज्या बातम्या
परभणी जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या तावडीत तीन बालक गंभीर जखमी; पालकांमध्ये संताप
By nisha patil - 12/22/2025 1:22:14 PM
Share This News:
परभणी (जिंतूर) : परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील हिदायत नगर परिसरात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन लहान बालक गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली असून घरासमोर रस्त्यावर खेळत असलेल्या बालकांवर अचानक भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केला. या हल्ल्यात सहा वर्षांचा शेख रिजवान शेख हुसेन याच्या डोक्याला गंभीर चावा बसला असून पाच वर्षांचा सय्यद तैमुर सय्यद फेरोज आणि एक वर्षांची जुनैरा तौफिक कुरेशी ही बालकेही गंभीर जखमी झाली आहेत.
हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी तत्काळ धाव घेत बालकांना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. नगरपालिकेने तातडीने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवावे, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
परभणी जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या तावडीत तीन बालक गंभीर जखमी; पालकांमध्ये संताप
|