आरोग्य

तीन महिन्यांचा त्रास संपला! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याच्या फुफ्फुसातून एलईडी बल्ब काढण्यात डॉक्टरांना यश

Three months of suffering are over


By nisha patil - 11/9/2025 12:57:39 PM
Share This News:



तीन महिन्यांचा त्रास संपला! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याच्या फुफ्फुसातून एलईडी बल्ब काढण्यात डॉक्टरांना यश

कोल्हापूर : कोल्हापुरातील एका साडेतीन वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसात अडकलेला धातूचा एलईडी बल्ब अखेर डॉक्टरांनी यशस्वीरित्या बाहेर काढला. तीन महिन्यांपासून खोकला आणि श्वसनाचा त्रास सहन करणाऱ्या या चिमुकल्याला अखेर दिलासा मिळाला आहे.

खेळताना गिळला बल्ब

आरव पाटील (वय ३.५) हा खेळण्यातील बसशी खेळत असताना अचानक बस तुटली. त्यातील एलईडी बल्ब बाहेर पडला आणि खेळता खेळता त्याने तो गिळला. काही दिवसांतच आरवला सतत खोकला व श्वसनाचा त्रास सुरू झाला. पालकांनी तातडीने उपचार सुरू केले.

कोल्हापूरात प्रयत्न अयशस्वी

सुरुवातीला कोल्हापूरात फ्लेक्सिबल ब्रॉन्कोस्कोपी करून बल्ब काढण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर आरवला मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

डॉक्टरांची मिनी थोरॅकोटॉमी शस्त्रक्रिया

हॉस्पिटलमध्ये दाखल होताच मुलगा न्यूमोनियाने त्रस्त असल्याचे आढळले. सीटी स्कॅननंतर धातूचा एलईडी बल्ब डाव्या ब्रॉन्कसमध्ये खोलवर अडकलेला असल्याचे स्पष्ट झाले. डॉ. विमेश राजपूत आणि डॉ. दिव्य प्रभात यांच्या टीमने मिनी थोरॅकोटॉमी (फक्त ४ सेमी कट) करून बल्ब यशस्वीरित्या काढला. भूलतज्ज्ञ डॉ. अनुराग जैन यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

मुलगा आता सुरक्षित

या शस्त्रक्रियेनंतर आरवचे फुफ्फुस पुन्हा व्यवस्थित कार्य करू लागले असून त्याच्या आरोग्यात सुधारणा होत आहे. चिमुकल्याचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.


तीन महिन्यांचा त्रास संपला! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याच्या फुफ्फुसातून एलईडी बल्ब काढण्यात डॉक्टरांना यश
Total Views: 212