बातम्या
घरफोडीतील तिघा अट्टल चोरट्यांना अटक.
By nisha patil - 4/26/2025 2:58:10 PM
Share This News:
घरफोडीतील तिघा अट्टल चोरट्यांना अटक.
67 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
घरफोडी करणाऱ्या तिघा अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केलीय. सलीम महमद शेख, जावेद महमद शेख दोघेही रा.गंधारपावले ,जि.रायगड व कोल्हापूरच्या आर के नगर मधील तौफिक महमद शेख अशी आरोपींची नावे आहेत.त्यांच्याकडून 61 तोळे 08 gm.वजनाचे सोन्याचे दागिने आणि 4 कि.787 gm.वजनाचे चांदीचे दागिने आणि इतर असा एकूण 67 लाख 48 हजार 150/ रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केलाय. याचबरोबर घरफोडीच्या 32 गुन्हयांसह एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा त्यांच्याकडून पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या उपस्थितीत कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने ही माहिती दिली आहे.
घरफोडीतील तिघा अट्टल चोरट्यांना अटक.
|