बातम्या

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांचा जागतिक 'टॉप १०००’ संशोधका'मध्ये समावेश

Three professors from D Y Patil University included


By nisha patil - 5/10/2026 11:24:22 PM
Share This News:



डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांचा जागतिक 'टॉप १०००’ संशोधका'मध्ये समावेश

शैक्षणिक संशोधन निर्देशांकातर्फे (Academic Research Index) जाहीर करण्यात आलेल्या २०२६ च्या जागतिक 'टॉप १००० संशोधक' क्रमवारीत डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथील तीन प्राध्यापकांनी स्थान मिळवले आहे.  या यादीत प्रा. (डॉ.) विनायक पारळे यानी ४९ वे स्थान मिळवले असून डॉ. शिवानंद एस. शिरकोले यानी १९५ वे तर डॉ. उमेश व्ही. शेंबडे यांनी ५०९ वे स्थान प्राप्त केले आहे. 

प्रा. (डॉ.) विनायक पारळे यांचे जपानमध्ये प्रथम स्थान
विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चचे अधिष्ठाता प्रा. (डॉ.) विनायक जी. पारळे यांनी “एरोजेल्स आणि उष्णतारोधन तंत्रज्ञान” या अत्यंत महत्त्वाच्या संशोधन विषयात २०२१-२०२५ या प्रभाव कालावधीसाठी जागतिक क्रमवारीत ४९ वे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, जागतिक टॉप १००० मध्ये या विषयात त्यांनी जपानमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ९५.१० असून ते जगातील सर्वोच्च १.१ टक्के वैज्ञानिकांमध्ये समाविष्ट आहेत. या विद्यापीठात रुजू होण्यापूर्वी त्यांनी जपानच्या हिरोशिमा विद्यापीठात आणि दक्षिण कोरियाच्या यॉन्सेई विद्यापीठात महत्त्वपूर्ण संशोधन कार्य केले असून, त्यांचा यापूर्वी स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून जाहीर होणाऱ्या जगातील सर्वोच्च २ टक्के वैज्ञानिकांच्या यादीतही समावेश झाला होता.

विद्यापीठाचे अधिष्ठाता (आंतरराष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कक्ष) डॉ. शिवानंद एस. शिरकोले यांनी “अन्न गोठवण व स्फटिकीकरण प्रक्रिया” या संशोधन विषयात २०२१-२०२५ या कालावधीसाठी जागतिक स्तरावर १९५ वे स्थान मिळवले आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ७७.९० असून ते जगातील ११.१ टक्के सर्वोच्च वैज्ञानिकांमध्ये आहेत.

प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग सहाय्यक प्राध्यापक डॉ. उमेश व्ही. शेंबडे यांनी “संक्रमण धातूंचे ऑक्साइड नॅनोपदार्थ” या विषयात जागतिक स्तरावर ५०९ वे स्थान, तर भारतामध्ये ७८ वे स्थान प्राप्त केले आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ८८.८२ असून ते जगातील ४.३ टक्के सर्वोच्च वैज्ञानिकांमध्ये गणले जातात.

प्रगत पदार्थ विज्ञान, थर्मल इन्सुलेशन, क्रिस्टलायझेशन आणि नॅनोमटेरियल्स यांसारख्या अत्याधुनिक संशोधन क्षेत्रांत तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ वेगवान प्रगती केली आहे.  प्राध्यापकांच्या यशाने विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय संशोधनाला एक नवी दिशा दिली आहे.

विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, प्र-कुलपती ऋतुराज संजय पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. अनिलकुमार एस. गुप्ता आणि कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र ए. खोत  यांनी या तिन्ही संशोधकांचे अभिनंदन केले.


डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांचा जागतिक 'टॉप १०००’ संशोधका'मध्ये समावेश
Total Views: 19