खेळ
राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत शहाजी कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांची निवड
By nisha patil - 12/12/2025 1:36:27 PM
Share This News:
कोल्हापूर: दिनांक 18 ते 21 डिसेंबर 2025 अखेर उत्तर प्रदेशातील आग्रा या ठिकाणी होणाऱ्या 19 वर्षाखालील 33 वी राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या तीन खेळाडूंची निवड महाराष्ट्र संघातून झाली.
महाराष्ट्र संघात पृथ्वीराज संतोष रांजगणे, अभय विशाल रजपूत व आयुष अशोक पाटील या तिघांची निवड झाली. तत्पूर्वी नंदुरबार येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत उच्चतम कामगिरी करीत पृथ्वीराज रांजगणे यांनी दोन वेळेला मॅन ऑफ द मॅच व अभय रजपूत याने एक वेळेला मॅन ऑफ द मॅच किताबाने गौरविण्यात आले.
निवड झालेल्या खेळाडूंना श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे व्हॉइस चीफ पेट्रन व चेअरमन मा मानसिंग बोंद्रे दादा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के. शानेदिवाण , जिमखाना प्रमुख डॉ प्रशांत पाटील, प्रा पी के पाटील, क्रीडा शिक्षक प्रा प्रशांत मोटे व प्रशिक्षक श्री संदीप लंबे यांचे मार्गदर्शन लाभले.
राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत शहाजी कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांची निवड
|