बातम्या

तिघे चोरटे अटकेत; १,३२२ मीटर केबलसह १.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Three thieves arrested


By nisha patil - 9/12/2025 3:12:40 PM
Share This News:



तिघे चोरटे अटकेत; १,३२२ मीटर केबलसह १.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

LCB कोल्हापूरची धडाकेबाज कारवाई

कोल्हापूर: जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष मोहिम राबवण्याच्या सूचना दिल्यानंतर LCB पथकाला मोठे यश मिळाले आहे.

गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ३८५/२०२५ केबल चोरी प्रकरणात तिघा चोरट्यांना अटक करून १,३२२ मीटर केबल, बजाज रिक्षा आणि मोबाईलसह एकूण १,४३,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उजळाईवाडी–भारती विद्यापीठ–पुणे–बेंगलोर हायवे कॉर्नरवर सापळा रचला.यावेळी आरोपी विनोद मछले (४६), शुभम बागडे (२७) आणि चेतन लोंढे (१९) हे चोरीच्या केबलसह रिक्षातून जाताना थांबवून ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत साहील पांडागळे याच्यासह मिळून केबल चोरी केल्याचे उघड केले. अटक आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहेत.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक योगेश कुमार, मा. अपर पोलीस अधीक्षक बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पथकात वैभव पाटील, विशाल खराडे, सत्यजित तानुगडे, प्रदीप पाटील, संजय हुंबे, अमित मर्दाने, शिवानंद मठपती, रोहित मर्दाने, योगेश गोसावी, राजू कोरे यांचा समावेश होता


तिघे चोरटे अटकेत; १,३२२ मीटर केबलसह १.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त
Total Views: 36