बातम्या

शिरोळ तालुक्यात थरार! महिलेच्या घरी शिक्षक रंगेहाथ पकडला; नातलगांचा उद्रेक, मारहाण करून दोरीने बांधून ठेवले

Thrill in Shirol taluka

By nisha patil - 11/29/2025 3:31:21 PM
Share This News:

शिरोळ तालुक्यात थरार! महिलेच्या घरी शिक्षक रंगेहाथ पकडला; नातलगांचा उद्रेक, मारहाण करून दोरीने बांधून ठेवले

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील टाकवडे गावात एका तरुण शिक्षकाला महिलेसोबतच्या अनैतिक संबंधांचा संशय चांगलाच महागात पडला. इचलकरंजीतील एका प्रसिद्ध शाळेत कार्यरत असलेल्या या शिक्षकाचे त्या महिलेसोबत बराच काळ संबंध असल्याचा घरच्यांना संशय होता. अनेकदा ताकीद देऊनही परिस्थितीत बदल न झाल्याने अखेर नातेवाइकांनीच कारवाईचा बडगा उगारला.

शुक्रवारी सायंकाळी शिक्षक महिलेच्या घरी पोहोचताच घरच्यांनी त्याला रंगेहाथ पकडले. संतापलेल्या नातलगांनी त्याला बेदम मारहाण करत नग्न अवस्थेत दोरीने बांधून घरातच बंद केले. काही वेळातच ही माहिती गावभर वाऱ्यासारखी पसरली आणि मोठी गर्दी घरासमोर जमली. काही नागरिकांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र नातलग गुन्हा दाखल करण्याच्या भूमिकेवर ठामच राहिले.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून शिरोळ पोलिसांनी तातडीनेपणे घटनास्थळी धाव घेतली. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी शिक्षकाची सुटका करत त्याला सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात हलवले. या घटनेमुळे टाकवडे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास शिरोळ पोलीस करीत आहेत.

शिरोळ तालुक्यात थरार! महिलेच्या घरी शिक्षक रंगेहाथ पकडला; नातलगांचा उद्रेक, मारहाण करून दोरीने बांधून ठेवले
Total Views: 41