मनोरंजन

उसण्याबायकोची वरात – लग्नाची : ६४व्या राज्य नाट्यस्पर्धेत धम्माल! सभागृहात हशाचा स्फोट

Thrilling at the 64th State Drama


By nisha patil - 11/19/2025 12:49:28 PM
Share This News:



६४ वी हौशी राज्य नाट्यस्पर्धा रंगतदार होत असताना, काल सादर झालेलं ‘उसण्याबायकोची वरात – लग्नाची’ हे दोन अंकी विनोदी नाटक प्रेक्षकांसाठी अक्षरशः हास्याचा महापूर ठरलं. लेखक दशरथ राणे आणि दिग्दर्शक मुरलीधर परापत्रे यांच्या या नाटकाने सभागृहात हशा, टाळ्या आणि आनंदाचा खराखुरा उत्सवच घडवला.

नवखे कलाकार असले तरी त्यांच्या टायमिंगची अचूकता, संवादफेक, नैसर्गिक हावभाव आणि विनोदी परिस्थिती हाताळण्याचा कमाल सेन्स—यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावलं. दिग्दर्शक परापत्रे यांनी दोन अंकी नाटकाची गती एक क्षणही ढिलो न पडू देता जे समन्वय, गोंधळ आणि मजेशीर प्रसंग उभे केले, त्यामुळे संपूर्ण प्रयोगात टाळ्यांचा गजर एक क्षणही थांबला नाही.

राणे यांच्या कथेमधील खोटं-खोटं लग्न, उसणी बायको, बनावट इन्स्पेक्टर, चाळीतील भन्नाट गोंधळ आणि सतत उलगडत जाणारे विनोदी ट्विस्ट हे नाटकाचं खरं बलस्थान ठरलं. प्रकाशयोजना, सेटची चाळीप्रमाणे केलेली नेटक्या मांडणी आणि कलाकारांची ऊर्जा यामुळे मंचावरची प्रत्येक फ्रेम जिवंत, रंगतदार आणि प्रचंड मजेशीर वाटली.

श्यामचा निरागस गोंधळ, राधाची नाचती-उडाणटप्पू स्टाईल, शंखानंदच्या भन्नाट आयडिया, बोंबले मामांचा संशयी अंदाज, बबलूची अडखळती कॉमेडी आणि बुवांची सततची धांदल—या सगळ्यांनी मिळून सभागृह अक्षरशः गाजवून टाकलं.

एकंदरीत अभिनय, कथा, दिग्दर्शन, सेट आणि विनोदाचा परफेक्ट मेळ साधत ‘उसण्याबायकोची वरात – लग्नाची’ हा प्रयोग ६४व्या हौशी राज्य नाट्यस्पर्धेतील सर्वाधिक धम्माल आणि प्रेक्षकप्रिय प्रयोगांपैकी एक ठरला.


उसण्याबायकोची वरात – लग्नाची : ६४व्या राज्य नाट्यस्पर्धेत धम्माल! सभागृहात हशाचा स्फोट
Total Views: 36