विशेष बातम्या
राधानगरीत धबधब्यात तरुणाचा थरारक बचाव; मुसळधार पावसामुळे पर्यटकांची मोठी गर्दी
By nisha patil - 6/23/2025 7:46:16 PM
Share This News:
राधानगरीत धबधब्यात तरुणाचा थरारक बचाव; मुसळधार पावसामुळे पर्यटकांची मोठी गर्दी
कोल्हापूर शहरात पावसाने उघडीप असली, तरी राधानगरी आणि भुदरगड तालुक्यात संततधार पावसाने जोर पकडला आहे. या मुसळधार पावसामुळे परिसरातील सर्वच धबधबे प्रवाहित झाले असून, पर्यटकांची गर्दीही वाढत आहे.
राऊतवाडी येथील प्रसिद्ध धबधब्याजवळ एक धक्कादायक घटना घडली. सेल्फी काढण्याच्या नादात एका तरुणाचा पाय घसरून तो थेट पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहत गेला. मात्र, त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांनी प्रसंगावधान दाखवत त्याला वेळेत वाचवलं आणि एक मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, पावसामुळे धबधब्यांचा वेग अधिकच वाढला असून, घाटांमध्ये दाट धुकं आणि जोरदार सरी यामुळे परिस्थिती अधिक धोकादायक बनत आहे. तरी पर्यटकांनी काळजी घ्यावी आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
राधानगरीत धबधब्यात तरुणाचा थरारक बचाव; मुसळधार पावसामुळे पर्यटकांची मोठी गर्दी
|