बातम्या
गुरव कुटुंबावर काळाचा घाला – घरात घुसून पत्नीची हत्या, लाखोंची लूट
By nisha patil - 5/19/2025 5:13:23 PM
Share This News:
गुरव कुटुंबावर काळाचा घाला – घरात घुसून पत्नीची हत्या, लाखोंची लूट
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील मडिलगे गावात रविवारी पहाटे सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. माजी उपसरपंच सुशांत गुरव यांच्या घरात घुसून चार दरोडेखोरांनी सुमारे साडे दहा लाखांची लूट केली. यावेळी त्यांच्या पत्नी पूजा गुरव यांची लोखंडी रॉडने हत्या करण्यात आली, तर सुशांत गुरव गंभीर जखमी झाले.
दरोडेखोरांनी घरात शिरून पती-पत्नीला मारहाण केली. सुशांत गुरव बाथरूममध्ये असताना त्यांच्या पत्नीला दागिने व रोख रक्कम हिसकावून डोक्यावर घाव घालण्यात आला. त्यांच्या दोन लहान मुलांना मात्र काही इजा करण्यात आली नाही.
पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथकासह धाव घेतली, मात्र श्वान घराभोवतीच घुटमळत राहिला. पोलिसांनी दरोडा आणि खुनाच्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे.
गुरव कुटुंबावर काळाचा घाला – घरात घुसून पत्नीची हत्या, लाखोंची लूट
|