बातम्या
अखिल भारतीय किसान सभेच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला यश
By nisha patil - 9/1/2026 5:42:30 PM
Share This News:
अखिल भारतीय किसान सभेच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला यश
आजरा (हसन तकीलदार ):-आरळगुंडी ग्रामपंचायतीची सखोल चौकशी साठी मंगळवार दि. 6 जानेवारी,2026 पासून भुदरगड पंचायत समिती कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान सभा संघटनेच्या वतीने "बेमुदत ठिय्या आंदोलन" सुरू होते.
त्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. आरळगुंडीच्या विविध मागण्यांच्या सखोल व बिनचूक सविस्तर अहवाल लेखी स्वरूपात संघटनेला देण्यासाठी गट विकास अधिकारी यांनी नऊ जणांची चौकशी समिती नेमलेली आहे. याबाबतीत गटविकास अधिकारी यांनी चौकशी समिती नेमून ग्रामपंचायत आरळगुंडी ता. भुदरगड जि.कोल्हापूरच्या कारभाराची सखोल बिनचुक व सविस्तर चौकशी करून दोषींवर ताबडतोब कारवाई करणार आहे.असे लेखी पत्राद्वारे अखिल भारतीय किसान सभेला आश्वासन दिलेले आहे.
मात्र बेमुदत आत्मक्लेष सत्याग्रही आंदोलन करणार आहे. जोपर्यंत न्यायिक बाजूने न्याय मिळत नाही तोपर्यंत हे बेमुदत आत्मकलेश आंदोलन चालू राहणार आहे.बेकायदेशीररित्या मंदिरात कोंडून ठेवून शासकीय कामात अडथळा केलेला आहे. आपल्या विभागाच्या वतीने सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा. यासाठी आपण ताबडतोब ही प्रक्रिया पूर्ण करावी.यासाठी हे आंदोलन सुरू राहणार असे आखिल भारतीय किसान सभेचे समन्वयक
कॉ.संग्राम सावंत यांनी सांगितले. यावेळी ॲड.दशरथ दळवी, सारिका देवेकर,मेघाराणी भाईंगडे ,धनाजी शेटके, युवराज पाटील, मारूती पाटील,उत्तम कांबळे,सुनिल जाधव, दयानंद पाटील, विनोद देवेकर,गीता पाटील,शाहूबाई देवेकर, मीना पाटील,बयाबाई पाटील, कृष्णा शेटके,रंजना पाटील, मारूती पाटील,अश्विनी कांबळे, सुप्रिया देवेकर, पुजा पाटील तसेच आरळगुंडी ग्रामस्थ उपस्थित होते
अखिल भारतीय किसान सभेच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला यश
|