राजकीय

कै. अजितदादा पवार यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी उत्तुर मतदार संघातील शिरीष देसाई, विकास चोथे व सौ. जयश्री गाडे यांना विजयी करा

To repay the debt owed to the late Ajitdada Pawar ensure the victory of Shirish Desai Vikas Chothe and Mrs Jayshree Gade from the Uttur constituency


By nisha patil - 4/2/2026 11:25:21 AM
Share This News:



कै. अजितदादा पवार यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी उत्तुर मतदार संघातील शिरीष देसाई, विकास चोथे व सौ. जयश्री गाडे यांना विजयी करा
          
मंत्री हसन मुश्रीफ यांचे जाहीर सभेत आवाहन
       
उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघाच्या जाहीर सभेस जोरदार प्रतिसाद
      
सगळ्यांना फसवत सुटलेल्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करा     
       
उत्तूर :- दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय कै. अजितदादा पवार यांनी आंबेओहोळ प्रकल्पाचा निधी, शासकीय निसर्गोपचार व योगा महाविद्यालयाचा निधी, बस स्थानकाचा निधी यासह विविध विकास निधी देण्याचे काम केले आहे. त्यांच्या या ऋणातून उतराई होण्यासाठी उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघातील शिरीष देसाई, उत्तुर पंचायत समितीचे विकास चोथे व भादवन पंचायत समितीच्या सौ. जयश्री गाडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे भावनिक आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कै. अजितदादा पवार यांनी उत्तूर विभागासाठी नेहमीच भरभरून दिले आहे, असेही ते म्हणाले.
            
उत्तुर ता. आजरा येथे उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे होते. या सभेला मतदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.
          
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, या विभागाचे अनेक वर्षांचे आंबेओहोळ प्रकल्पाचे अपुरे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यासाठी कै. अजितदादांनी कोट्यावधींचा निधी दिला. परिणामी;  शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था झाली. तसेच, येथे होत असलेल्या निसर्गोपचार व योग महाविद्यालय, होवू घातलेल्या ट्रेनिंग सेंटर व फिजिओथेरपी सेंटरमुळे या पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. ते पुढे म्हणाले, लाडकी बहीण योजना आणताना उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्याकडे अर्थमंत्री म्हणून तिजोरीच्या किल्ल्या होत्या. महिला व बालकल्याण मंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे होते. त्यामुळे या योजनेवर आमचाच हक्क राहतो. येत्या काळात लवकरच लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देणार, असेही ते म्हणाले.


कै. अजितदादा पवार यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी उत्तुर मतदार संघातील शिरीष देसाई, विकास चोथे व सौ. जयश्री गाडे यांना विजयी करा
Total Views: 18