बातम्या

आजरा पं. स. सभापतीपदी गाडे, उपसभापतीपदी पोवार

Today Pt S Gade is the chairman Powar is the deputy chairman


By Administrator - 11/3/2026 10:51:27 AM
Share This News:



आजरा पं. स. सभापतीपदी गाडे, उपसभापतीपदी पोवार

आजरा पंचायत समितीवर महिला राज

आजरा(हसन तकीलदार) :- आजरा पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जयश्री गाडे (भादवण) यांची, तर उपसभापतीपदी शिवसेना ठाकरे गटाच्या यशोदा पोवार (देऊळवाडी) यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षपदी तहसीलदार समीर माने होते. गटविकास अधिकारी सुभाष सावंत उपस्थित होते. तालुक्याच्या इतिहासात प्रथमच दोन महिला एकत्रित पदभार स्वीकारणार आहेत.त्यामुळे आता आजरा पंचायत समितीवर महिला राज आलेले आहे.
चार वर्षांनंतर पंचायत समितीचे नवे सभागृह आज अस्तित्वात आले आहे. सकाळी अर्ज भरण्याच्या वेळेत सभापतीपदासाठी जयश्री गाडे, तर उपसभापतीपदासाठी यशोदा पोवार यांचा प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला. दोन्ही पदांसाठी विकास चोथे हे सूचक होते. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्यामुळे गाडे व पोवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी समीर माने यांनी जाहीर केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती नूतन सदस्य व पदाधिकाऱ्यांचा प्रशासन व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सत्कार करून यावेळी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आजरा साखर कारखाना अध्यक्ष मुकुंद देसाई म्हणाले, नूतन सदस्यांकडून चांगले काम व्हावे, ही अपेक्षा आहे. सदस्य नवीन आहेत त्यामुळे प्रशासनाने त्यांना सहकार्य करावे. राजकीय विरोध आता संपला आहे. त्यामुळे आता एकमेकांनी हातात हात घालून विकास कामासाठी सर्वांनी काम करूया त्याचप्रमाणे कायदा व व्यवहार याची सांगड घालून प्रशासनाने काम करावे.

जिल्हा परिषद गटनेते सुधीर देसाई म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या मतदारसंघांची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे जबाबदारी देखील वाढली आहे. लोकांची कामे सुलभतेने व्हावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी काम केले पाहिजे. तालुक्यातील महिला बचत गट सक्षमीकरण आणि शिक्षणाचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न करू या असे म्हणाले.
जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई म्हणाले, जबाबदारीचे भान ठेवून नवनियुक्त सदस्य, पदाधिकारी व प्रशासन यांना काम करावे लागेल. 
  नूतन सभापती जयश्री गाडे, नूतन उपसभापती यशोदा पोवार, पंचायत समिती सदस्य समीर पारदे, विकास चोथे यांनी मनोगत व्यक्त करताना,जनतेने आपल्यावर विश्वास दाखवला आहे, त्यास तडा न जाता अधिकाधिक निधी आणून विकास साधण्यासाठी सर्वजण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी कॉ. संपत देसाई म्हणाले, नवनियुक्त सदस्य आणि पदाधिकारी जनतेने ज्या पद्धतीने विश्वासाने निवडून दिले आहे त्या विश्वासास सार्थ ठरतील.शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, संभाजी तांबेकर, माजी सभापती अल्बर्ट डिसोझा, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा रेजिना फर्नांडिस यांनीही यावेळी आपली मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सभापती वसंतराव धुरे, आजरा साखर संचालक एम. के. देसाई, अशोक तर्डेकर, दीपक देसाई, रचना होलम, मनीषा देसाई, दिगंबर देसाई, गोविंद पाटील, शिवाजी नांदवडेकर(सर), राजेंद्र मुरुकटे, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, संघाचे उपाध्यक्ष दौलती पाटील, युवराज पोवार,माजी उपसभापती कामिना पाटील, संजय गाडे, संजय येजरे, राजू होलम, वसंत कोंडूसकर, सहायक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव
यांच्यासह कार्यकर्ते, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आजरा पं. स. सभापतीपदी गाडे, उपसभापतीपदी पोवार
Total Views: 77