बातम्या
पन्हाळगडावर चिमुकल्याचा ‘गुढीपाडवा प्रवेश शाळेचा आज पहिला दिवस,
By Administrator - 3/19/2026 4:19:26 PM
Share This News:
पन्हाळगडावर चिमुकल्याचा ‘गुढीपाडवा प्रवेश शाळेचा आज पहिला दिवस,
पन्हाळा प्रतिनिधी, शहाबाज मुजावर गुढीपाडव्याच्या अवचित साधून आज पन्हाळा कुमार विद्यामंदिर व कन्या विद्या मंदिर येथे पहिली मध्ये चिमुकल्याचा प्रवेश देण्यात आला. फुलांचा वर्षाव करून त्या लहान मुलांना फेटे घालून त्यांचा प्रवेश देण्यात आले. तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.या चिमुकल्यांना पेन्सिल,वही भेट म्हणून देण्यात आली.
गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद आज पन्हाळगडावर पाहाव्यास मिळाला. तसेच या सर्व मुलांचे पालकांचे स्वागत शिक्षक गायकवाड तसेच शिक्षिका चिले मॅडम यांनी स्वागत केले.
शालेय शिक्षण समिती अध्यक्ष नवाज मुजावर यांनी सांगितले की, आपली कुमार विद्या मंदिर पन्हाळा ही शाळा सर्व सोईनयुक्त आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला आमची शाळा ही नवीन वर्ष, नवीन स्वप्ने, नवीन दिशा आपल्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पन्हाळा येथे इयत्ता पहिली प्रवेश येणाऱ्या विद्यार्थ्यांना.प्रेमळ, सुरक्षित व आनंदी वातावरण अनुभवी व कुशल शिक्षक खेळातून शिक्षण पद्धती विशेष आकर्षण आहे,इंग्रजी शाळेत घालण्याची गरज नाही,आमच्या शाळेतच मुलांना आत्मविश्वासाने इंग्रजी बोलायला शिकवू तसेच आमच्या विशेष सुविधा विद्यासाठी शासनाने उपलब्ध करून दिले आहेत.
जसे की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवले आहे. मोफत पाठ्यपुस्तके,मोफत गणवेश,शूज,मध्यान्ह भोजन आमचे शिक्षक तळमळीने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे यावर्षी आमच्या शाळेची विद्यार्थिनी प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल आमच्या चांगला लागला आहे.त्यामध्ये शिवण्या शैलेश पाटील केंद्रात २३०गुण मिळवून पहिली तर अन्वी अमीत कवडे केंद्रात तिसरी आली आहे. सर्वच क्षेत्रात मुले आघाडीवर आहेत. तसेच,कवायत कबड्डी, खो-खो व इतर खेळ जो कोणी पाहुणे गडावर येतील त्यावेळी आमचीच विद्यार्थी त्यांच्या स्वागतासाठी झांजपथक व लेझीम घेऊन खेळ दाखवत असतात.
तसेच योगासने पहिलीपासून इंग्रजी अध्यापन देशप्रेम व सर्व धर्म समभाव सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडवणारे अष्टपैलू शिक्षक सरदार गायकवाड आमच्या या केंद्राला शाळेला लाभले आहेत. याचा सर्व पन्हाळा वासियांनी तसेच बांधारीतील विद्यार्थ्यांनी यांचा लाभ घ्यावा असे आव्हान शालेय समिती अध्यक्ष यांनी केले.
शालेय समितीच्या माजी अध्यक्षा सौ. सुनीता प्रकाश उदाळे यांनी सर्व पालकांचे व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करताना सांगितले की, आपली संस्कृती टिकली पाहिजे, आपल्या शाळा टिकल्या पाहिजेत, पालकांनी इंग्लिश मीडियम च्या दिखाव्याकडे फॅशनकडे न जाता आपल्या पाल्यांना आपल्या मातृभाषेमध्ये शिक्षण द्यावे.
त्यामुळे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता,त्यांची आकलन क्षमता त्यांची राहणीमान हे वाढते. त्यांना सुद्धा आपल्याला समजवणे सोपे जाते.त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेतच घालावे. चिमुकल्यांवर जादा तान ओझे देऊ नये. मराठी शाळेमध्ये घातल्यामुळे सुनिता यांनी या सर्व पालकांचे स्वागत केले खास असे आभार मानलेत.
तसेच यावेळी इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणारा साडेसहा वर्षाच्या चिमुकला हर्ष शरीफ नगारजी याने छत्रपती शिवाजी महाराज यांची गारद ऐककून सर्व शिक्षक कर्मचारी व पालकांना चिमुकल्यांना भारवून टाकले.
यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, प्रमोद उदाळे, ज्येष्ठ गडावरील गाईड हनीफ नगारजी (चाचा), हेमंत जाधव ,सुशांत कांबळे, निसार नगारजी, शाकीरा गोलंदाज, फरहिन मुजावर नगरसेवक शहाबाज मुजावर,तसेच शाळेचे शिक्षक सरदार गायकवाड व शाळेची केंद्रप्रमुख मुख्याध्यापक रचना चिले (मॅडम) इत्यादीं उपस्थित होते.
पन्हाळगडावर चिमुकल्याचा ‘गुढीपाडवा प्रवेश शाळेचा आज पहिला दिवस,
|