बातम्या
*आज दिनांक ४/७/२०२६ रोजी मौजे देवर्डे तालुका आजरा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
By nisha patil - 5/7/2026 12:18:30 AM
Share This News:
*आज दिनांक ४/७/२०२६ रोजी मौजे देवर्डे तालुका आजरा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
*आजरा(हसन तकीलदार):-आज दि. 4/7/2026रोजी पुन्हा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीचे नियोजन स्थानिक प्रशासक व बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने करण्यात आले होते.तसे पाहता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती २६ मे २०२६ रोजी संपूर्ण भारतात साजरी केली जाते. पण देवर्डे गावात या वर्षी दोन वेळा जयंती साजरी करण्यात आली.२६ मे २०२६ रोजी देवर्डे गावातील बौद्ध बांधवांकडून जयंतीच्या कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले होते.
नागरिकांची शेतीच्या कामाची धावपळ सुरु असले कारणाने या कार्यक्रमाचे नियोजन रात्री ७ वाजता करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी काही बाहेरच्या गावातून मान्यवर ही उपस्थित होते. परंतु ग्रामपंचायत कडून तीन महिने वीज बिल थकीत राहिल्यामुळे येथील वीज पुरवठा स्थगित करण्यात आल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले.
नागरिकांनी ग्रामसेवक यांना संपर्क साधून वीजबिल भरून वीज सुरू करून देण्यास सांगितले. ग्रामसेवकांनी त्यांच्या विनंतीला दाद न दिल्यामुळे त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेले बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी डॉ.उल्हास त्रिरत्ने यांना या सर्व प्रकाराची माहिती उपस्थित नागरिकांनी दिली, डॉक्टर त्रिरत्ने ग्रामसेवकांना वीजबिल भरण्यासाठी विनंती केली असता जवळ पैसे नसल्याचे कारण सांगून टाळाटाळ केली.
नाईलाजाने राजर्षी शाहू महाराज यांची जयंती अंधारात करण्याची नामुष्की येथील नागरिकांवर आली. ज्या राजा मुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा सुखाने जगत आहे. त्यांनी केलेल्या कार्याचे उपकार कधी फिटू शकणार नाहीत इतके महान कार्य केलेल्या आपल्या राजाची जयंती अंधारात साजरी करावी लागली.हा अपमान सहन न झाल्यामुळे लगेचच दुसऱ्या दिवशी गटविकास अधिकारी यांना बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने घडलेल्या सर्व प्रकाराची लेखी तक्रार देण्यात आली. त्यावर ग्राम सेवक यांनी घडलेल्या सर्व प्रकाराबद्दल माफी मागून दि. 4 जुलै 2026 रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने देवर्डे गावात ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्याचे ठरले.त्या प्रमाणे आज दि. 4/7/2026 रोजी देवर्डे गावात जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमात आलेल्या पाहुणे मंडळींचे स्वागत ग्रामसेवक सुभाष येळने यांनी केले, मार्गदर्शन प्रा.सौरव देसाई यांनी केले तसेच डॉ. उल्हास त्रिरत्ने(पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी ),व जी.एम. पाटील( ग्राम पंचायत सदस्य )यांनी मनोगत व्यक्त केले, यावेळी सुरेश पुजारी(सहाय्यक गट विकास अधिकारी.) दिनेश शेटे (कृषीविभाग अधिकारी). कल्पना वसंत चाळके (सरपंच, देवर्डे ग्रामपंचायत), रूपाली तुकाराम कांबळे (पोलिस पाटील, देवर्डे),राहुल मोरे (प्रभारी राधानगरी मतदारसंघ बहुजन मुक्ती पार्टी ) डॉ सुदाम हेरर(अध्यक्ष, राधानगरी मतदारसंघ बहुजन मुक्ती पार्टी), शरद पाटील (अध्यक्ष, गडहिंग्लज तालुका,बामसेफ), संदीप दाभिलकर (अध्यक्ष आजरा तालुका बहुजन मुक्ती पार्टी), नितिन राऊत (अध्यक्ष,आजरा तालुका, RMBKS),अमित सुळेकर( प्रचारक, BMP) यशोदा संभाजी कांबळे (सदस्य, ग्रामपंचायत देवर्डे), महादेव बागडी(रोजगार सेवक)सचिन कांबळे,देवदास बोलके,शरद कांबळे,राजेंद्र देशमुख आदीजण उपस्थित होते. माजी सभापती निवृत्ती कांबळे यांनी आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले.
*आज दिनांक ४/६/२०२६ रोजी मौजे देवर्डे तालुका आजरा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
|