बातम्या

आजऱ्यात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य संकलन उपक्रम यशस्वी

Today the Nirmalya collection initiative by Dr Nanasaheb Dharmadhikari


By nisha patil - 2/9/2025 11:46:27 PM
Share This News:



आजऱ्यात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य संकलन उपक्रम यशस्वी

आजरा (हसन तकीलदार)  / प्रतिनिधी : डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आ. पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव व गौरी विसर्जनानिमित्त निर्माल्य संकलन उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम बेळगाव, संकेश्वर, निपाणी, गडहिंग्लज, आजरा व चंदगड येथे यशस्वीरीत्या पार पडला.

आजऱ्यात हिरण्यकेशी नदी घाटावर ३०० स्वयंसेवकांनी सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत सातत्याने निर्माल्य संकलन केले. भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत निर्माल्य दान केले. एकूण सहा ठिकाणी चाललेल्या या उपक्रमातून तब्बल ३६ टन निर्माल्य संकलित करण्यात आले. संकलित निर्माल्याचे खत तयार करून ते महाराष्ट्र व कर्नाटकातील वृक्षारोपण उपक्रमांसाठी वापरले जाणार आहे.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सामाजिक प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, वृक्षलागवड, जलसंधारण, रक्तदान, आरोग्य शिबिरे, निर्माल्य संकलन व कंपोस्टिंग अशा अनेक क्षेत्रात कार्य होत आहे. "Where there is need for the society, we are working in that field" या ब्रीदवाक्यानुसार प्रतिष्ठान सातत्याने समाजहितासाठी कार्यरत आहे.


आजऱ्यात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य संकलन उपक्रम यशस्वी
Total Views: 142