राशिभविष्य

आजचे राशिभविष्य १० मे २०२५

Todays horoscope 10 May 2025


By nisha patil - 9/5/2025 11:44:33 PM
Share This News:



🐏 मेष (Aries)
आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल. धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवू शकाल. बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल. 

🐂 वृषभ (Taurus)
आजचा दिवस आनंददायी आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपले काम निर्धारित वेळेत नियोजनानुसार पूर्ण होईल. आर्थिक लाभ संभवतात. 

👫 मिथुन (Gemini)
आज आपल्या मनात विविध विचार तरंग उमटतील. त्या विचारांत आपण गढून जाल. आज बौद्धिक कार्य कराल. मात्र वाद टाळावेत. आपण आज संवेदनशील व्हाल. आई व स्त्रियांशी संबंधित विषयात हळवे व्हाल. 

🦀 कर्क (Cancer)
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्य सुरू करण्यास अनुकूलता लाभेल. मित्र व नातलग भेटतील. प्रिय व्यक्ती कडून आनंद मिळेल. आप्तेष्टांसह पर्यटनाचे बेत आखाल. मनात प्रसन्नता राहील. 

🦁 सिंह (Leo)
आजचा दिवस सुखा समाधानात जाईल. भावंडा बरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचे सहकार्य पण आपणास मिळेल. संबंधां मधील भावनांची जाणीव आपणाला होईल. 

👧 कन्या (Virgo)
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आपले विचार समृद्ध होतील. आपल्या वाणीमुळे आपण फायदेशीर संबंध जुळवाल. व्यावसायिक दृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे. 

⚖️ तूळ (Libra)
आज आपण आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. सृजनशीलता वाढेल. 

🦂 वृश्चिक (Scorpio)
आजचा दिवस प्रतिकूलतेचा असून एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. शक्यतो वाद टाळावेत. आपल्या वक्तव्याने एखादा गैरसमज होण्याची शक्यता आहे. 

🏹 धनु (Sagittarius)
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. योग्य प्रकारे आर्थिक नियोजन कराल. इतरांच्या सहकार्यासाठी प्रयत्न कराल. प्रत्येक कामात यश मिळेल. व्यापार विषयक योजना आखाल. 

🐊 मकर (Capricorn)
आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी लाभदायी आहे. जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी दिवस अनुकूल आहे. सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होईल. त्यांच्या कडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. 

🌊 कुंभ (Aquarius)
आज अनेक विध विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल. मनातील संताप आवरण्याच्या प्रयत्नात काही अनिष्ट घडणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. चोरी, अवैध काम, निषेधार्ह काम व नकारात्मक विचारां पासून दूर राहणे हितावह राहील. 

🐟 मीन (Pisces)
आज आपणातील लेखक किंवा कलाकारास कला व्यक्त करण्याची संधी मिळेल. 


आजचे राशिभविष्य १० मे २०२५
Total Views: 111