राशिभविष्य
आजचे राशिभविष्य १८ एप्रिल २०२५
By nisha patil - 4/18/2025 5:58:06 AM
Share This News:
मेष (Aries)
आजचा दिवस संमिश्र आहे. काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, परंतु संध्याकाळपर्यंत रखडलेली कामे पूर्ण होतील. जोडीदाराची मदत लाभदायक ठरेल.
वृषभ (Taurus)
व्यवसायात नवीन डील होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे प्रतिष्ठा वाढेल. मुलांकडून आनंददायक बातम्या मिळतील.
मिथुन (Gemini)
आज सावधगिरी बाळगा; एखादी वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता आहे. मुलांच्या शिक्षणासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता.
कर्क (Cancer)
मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढण्याचे योग आहेत. रोजगाराच्या क्षेत्रात प्रगती होईल. प्रवासाचा लाभ होईल.
सिंह (Leo)
उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. बोलण्यात गोडवा असल्यामुळे मान-सन्मान वाढेल. डोळ्यांचे आजार त्रास देऊ शकतात; काळजी घ्या.
कन्या (Virgo)
व्यापारात उत्तम यश मिळेल. कायदेशीर वादात विजय मिळण्याची शक्यता आहे. समाजात मानसन्मान वाढेल.
तूळ (Libra)
आर्थिक चणचण कमी होईल. कुटुंबातील सदस्यांची मदत लाभेल. प्रवासाचे योग आहेत, परंतु काही कारणांमुळे पुढे ढकलावा लागू शकतो.
वृश्चिक (Scorpio)
तब्येतीच्या बाबतीत काही अडचणी येऊ शकतात. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. कामात फोकस कमी होऊ शकतो; काळजी घ्या.
धनु (Sagittarius)
सरकारी कामे पटापट मार्गी लागतील. सासरकडून धनलाभाचे योग आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घेण्याची संधी मिळेल.
मकर (Capricorn)
कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत यश मिळेल. सहकारी तुमचा उदोउदो करतील. सायंकाळी वादविवाद टाळा.
कुंभ (Aquarius)
तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. अनावश्यक वादविवाद होऊ शकतात; त्यापासून दूर राहा. सकारात्मक विचार करा.
मीन (Pisces)
मुलांची काळजी लागून राहील. वैवाहिक जीवनातील अडचणी कमी होतील. प्रवास करताना मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या; चोरी होण्याची शक्यता आहे.
आजचे राशिभविष्य १८ एप्रिल २०२५
|