बातम्या
सोन्याची अंडी देणारे टोलनाके उध्वस्त झाले पाहिजेत -रवी इंगवले
By nisha patil - 8/28/2025 5:33:58 PM
Share This News:
सोन्याची अंडी देणारे टोलनाके उध्वस्त झाले पाहिजेत -रवी इंगवले
आज रविकिरण विष्णुपंत इंगवले यांनी किनी टोल नाक्यावर जनतेसाठी मोकळा करून शिवसेनेच्या टोलविरोधी लढ्याची धडाकेबाज सुरुवात केली.
“सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मान्य करा अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल,” असा इशारा त्यांनी दिला.जनतेकडून करोडोंची टोलवसुली करून कंत्राटदार अब्जाधीश होतात; तरीही रस्ते खड्ड्यांनी भरलेले व धुळीने माखलेले असल्याची टीका इंगवले यांनी केली.“रस्ते नीट नसतील तर टोल वसुली थांबवा,” हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय तातडीने अंमलात आणण्याची मागणी इंगवले यांनी केली.
“किनी टोल नाका ही फक्त सुरुवात आहे. आता महाराष्ट्रातील सर्व टोलनाके जनता व शिवसेनेच्या साथीने मुक्त केले जातील,” असा इशारा इंगवले यांनी दिला.
सोन्याची अंडी देणारे टोलनाके उध्वस्त झाले पाहिजेत -रवी इंगवले
|