बातम्या
नशामुक्ती अभियानात धावले उद्याचे शिक्षक
By nisha patil - 11/10/2025 4:29:17 PM
Share This News:
नशामुक्ती अभियानात धावले उद्याचे शिक्षक
कोल्हापूर : दारुची नशा, जीवनाची दुर्दशा, ड्रगचा विळखा, ओळीच ओळखा , निरोगी भारत, नशामुक्त भारत हे ब्रीद घेवून श्रीमती महाराणी ताराराणी शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे छात्र आज भल्या पहाटे साडेपाच वाजता पोलीस परेड मैदानावर जमले आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मॅरेथॉन दौड करीत जनजागृती केली .
शासकीय अध्यापक महाविद्यालयातील प्रथम आणि द्वितीय वर्षाचे छात्र यामध्ये सहभागी झाले होते . या संपूर्ण अभियानाचे संयोजन अधिव्याख्याते डॉ. तारसिंग नाईक यांनी केले . प्राचार्या डॉ. लता पाटील यांनी छात्राध्यापकांचे उद्बोधन करतानाच सुदृढ आणि निरोगी भारतासाठी उद्याच्या शिक्षकांनी केलेली दौड उद्याच्या उज्वल भारतासाठी सार्थकी ठरेल असा विश्वास व्यक्त केला . या अभियानात प्रथम आणि द्वितीय वर्षाचे छात्र आणि छात्राध्यापिका सहभागी झाले होते .
नशामुक्ती अभियानात धावले उद्याचे शिक्षक
|