ताज्या बातम्या
कोल्हापुरात खंडपीठ व्हावे , यासाठी सर्वोच्च प्राधान्य : पालकमंत्री आबिटकर
By nisha patil - 12/2/2025 4:30:51 PM
Share This News:
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, यासाठी आपले सर्वोच्च प्राधान्य राहील. त्या दृष्टीने पाठपुरावा करू, अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकरांनी दिली. खंडपीठाच्या मागणीसाठी कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे, पदवीधर मित्रचे अध्यक्ष माणिक पाटील-चुयेकर रविवारपासून दसरा चौकात आमरण उपोषणास बसणार आहेत.
याच प्रश्नावर १८ फेब्रुवारी रोजी समस्त वकील, पक्षकार -व जनतेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य व लक्षवेधी महारॅली काढण्यात येणार आहे. याबाबत माणिक पाटील यांनी आबिटकर यांची भेट घेऊन माहिती दिली.यावेळी कोल्हापूर जिल्हा रेशन दुकानदार महासंघाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र मोरे, कोल्हापूर यूथ फाऊंडेशन अध्यक्ष डॉ. अजित राजगिरे, रमेश पाटील आदी उपस्थित होते.
कोल्हापुरात खंडपीठ व्हावे , यासाठी सर्वोच्च प्राधान्य : पालकमंत्री आबिटकर
|