विशेष बातम्या
ऐतिहासिक किल्ले भुदरगडावर पर्यटनाला नवे उड्डाण!
By nisha patil - 10/11/2025 4:46:51 PM
Share This News:
ऐतिहासिक किल्ले भुदरगडावर पर्यटनाला नवे उड्डाण!
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते साहसी खेळांच्या ॲक्टीव्हिटींचा शुभारंभ
भुदरगड, ता. भुदरगड : छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक किल्ले भुदरगड आता साहसी पर्यटनाचे नवे केंद्र बनत आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या पॅराग्लायडिंग, पॅरामोटरींग, झोरबिंग बॉल, वॉटर बोटींग, कायाकिंग, टेलिस्कोप व फ्लोटिंग जेटी या ॲक्टीव्हिटीजमुळे भुदरगड किल्ला पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरणार आहे.
या उपक्रमांचा शुभारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते भुदरगड किल्ल्यावर झाला. या प्रसंगी बोलताना आबिटकर म्हणाले,
> “भुदरगड किल्ल्याला सुंदर पर्यटनस्थळ बनविण्यासाठी आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना सर्व सोयीसुविधा मिळाव्यात, गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि जतन अबाधित राहावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
किल्ल्याच्या पर्यटन विकासाच्या कामांमध्ये किल्ल्याची डागडुजी, बालोद्यान उभारणी आणि तलावात बोटींगची सुविधा या महत्त्वाच्या सोयींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भुदरगड आता इतिहास, निसर्ग आणि साहस या तिन्हींचा संगम असलेले ठिकाण बनले आहे.
या कार्यक्रमास के.जी. नांदेकर, ज्येष्ठ नेते बाळकाका देसाई, भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजीराव पाटील, गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, दत्ताजीराव उगले, कल्याणराव निकम, मदनदादा देसाई, ॲड. शिवाजीराव राणे, दौलतराव जाधव सर यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होत!
ऐतिहासिक किल्ले भुदरगडावर पर्यटनाला नवे उड्डाण!
|