बातम्या

ग्रोबझ ट्रेडिंग फसवणूक प्रकरणातील पसार आरोपी सोमनाथ कोळी बेळगावात अटक

Trading fraud case was arrested in Belgaum


By nisha patil - 12/26/2025 12:11:03 PM
Share This News:



कोल्हापूर :- ग्रोबझ ट्रेडिंग कंपनीशी संबंधित बहुकोटींच्या फसवणूक प्रकरणातील पसार आरोपी सोमनाथ मधुसुदन कोळी (वय ३६, रा. दौलतनगर, राजारामपुरी, कोल्हापूर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बेळगाव बस स्थानकातून अटक केली आहे. तो सप्टेंबर २०२२ पासून तीन वर्षांपासून पसार होता आणि सातत्याने मोबाईल नंबर बदलत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

ग्रोबझ ट्रेडिंग कंपनीने गुंतवणूकदारांना कमी कालावधीत मोठा परतावा मिळेल अशी आमिष दाखवून सुमारे २६ हजार गुंतवणूकदारांचे हजारो कोटींचे पैसे घेतले होते. वेळेत परतावा न दिल्याने शाहूपुरी पोलिस ठाण्यात कंपनीसह २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. अटक केलेल्या कोळीचा मुख्य सूत्रधार विश्वास कोळी याचा मेहुणा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्या निर्देशनावर LCB पथकाने आरोपीचा शोध लावत तपास गतिमान केला आणि त्याला बेळगावमध्ये ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार युवराज पाटील, अमित सर्जे आणि शुभम संकपाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे आरोपीचा ताबा दिला आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी तक्रारी देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


ग्रोबझ ट्रेडिंग फसवणूक प्रकरणातील पसार आरोपी सोमनाथ कोळी बेळगावात अटक
Total Views: 37