बातम्या
शाही दसरा महोत्सवानिमित्त मंगळवारी पारंपरिक वेशभूषा दिवस
By nisha patil - 9/22/2025 2:45:52 PM
Share This News:
शाही दसरा महोत्सवानिमित्त मंगळवारी पारंपरिक वेशभूषा दिवस
कोल्हापूर, : यावर्षी राज्य शासनाने राज्यातील प्रमुख महोत्सवामध्ये कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवाचा समावेश केला आहे. त्यामुळे यावर्षीपासून कोल्हापूरचा दसरा महोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात दिनांक 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यानुषंगाने येत्या मंगळवारी पारंपरिक वेशभूषा दिवस साजरा करण्यात येणार आहे.
कोल्हापूरची संस्कृती, परंपरा आणि पारंपरिक वेशभूषेतून दिवस साजरा करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे. येथील स्थानिक संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने सर्व नागरिकांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून तसेच कोल्हापुरी चप्पल घालून हा उपक्रम यशस्वी करावा. यामुळे राज्यातील सर्व नागरिक तसेच पर्यटकांना देखील आपली परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन होईल.
मंगळवार, दिनांक 23 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील विविध शासकीय, निम शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयये, विविध संघटनांसह सर्व आस्थापना व सर्व नागरिक पारंपरिक वेशभूषा परिधान करुन या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शाही दसरा महोत्सवानिमित्त मंगळवारी पारंपरिक वेशभूषा दिवस
|