बातम्या
उजळाईवाडीत पारंपरिक खेळांचा जल्लोष...
By nisha patil - 4/9/2025 3:31:54 PM
Share This News:
उजळाईवाडीत पारंपरिक खेळांचा जल्लोष...
गणेशोत्सवातून संस्कृती आणि एकतेचा संदेश
शिव पार्वती कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, उजळाईवाडी यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त पारंपरिक खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. सूप नाचवणे, घागर नाचवणे, फुगडी, पाणी भरणे, पिठातून पैसे काढणे, रिंगमधून जाणे अशा खेळांत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या उपक्रमातून जुन्या परंपरांची गोड आठवण ताजी झाली तसेच समाजात एकोपा, सहकार्य आणि सांस्कृतिक जतनाचा संदेश देण्यात आला. विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव हा फक्त आनंदाचा नाही तर परंपरा आणि एकतेचा दीप जपण्याचा सण असल्याचे प्रतिपादन केले.
उजळाईवाडीत पारंपरिक खेळांचा जल्लोष...
|