राजकीय
हलकर्णी -चंदगड रस्त्याच्या कामामुळे वाहतूकदारांची होतेय गैरसोय
By nisha patil - 12/17/2025 12:45:06 PM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार):- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यामार्फत हलकर्णी -चंदगड सिमेंट काँक्रिटचे रस्ते करण्याचे काम सुरु आहे. सिमेंट काँक्रिटचा रस्ता करताना अनेक त्रुट्या दिसून येत असल्यामुळे वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी पुढे येताना दिसत आहेत.
आजरा तालुक्यातील प्रामुख्याने मलिग्रे, हत्तीवडे, होनेवाडी, बोलकेवाडी, मेंढोली, शृंगारवाडी येथील वाहनधारकांना रस्त्यावरून येताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्ता करताना वाटंगी,मलिग्रे पर्यंत एक बाजू सिमेंटने रस्ता करणे सुरु असले तरी दुसरी बाजू उकरून खडीचे मोठे दगड असल्याने टू व्हीलर त्यावरून चढवताना गाडी स्लिप होऊन अपघात होत आहेत. सिमेंटच्या रस्त्यावर पाण्याचा कमी वापर करीत असल्याची तक्रार पुढे येत आहे.
तसेच रस्त्याच्या दर्जबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. खोदलेल्या रस्त्यांचे ढीगही रस्त्यातच असल्याने वाहनाला ओव्हरटेक करताना अडचण येत आहे तसेच पाणी मारलेले नसल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे रस्त्याचे काम सुरु असल्याने याभागातील ऊसतोड करून कारखान्याला ऊस पाठवण्यासाठी अडचणी येत असल्याची तक्रार ऊस बागायतदार शेतकरी करीत आहेत. भागातील ऊस ऐनापूर मार्गे वाहतूक करावी लागत असल्याने ऊस वाहतूक करणाऱ्यांची गैरसोय होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम नियोजनबद्ध व लवकर होणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे. या मार्गावरील काही धोकादायक वळणे काढणे गरजेचे आहे त्यामुळे भविष्यात होणारे अपघात टाळता येणार आहेत असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
हलकर्णी -चंदगड रस्त्याच्या कामामुळे वाहतूकदारांची होतेय गैरसोय
|