विशेष बातम्या
विनर्स झेप यांच्या वतीने वृक्षारोपण संपन्न
By nisha patil - 6/26/2025 11:10:26 PM
Share This News:
विनर्स झेप यांच्या वतीने वृक्षारोपण संपन्न
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्या "विनर्स झेप"स्पर्धा परिवार कोल्हापूर यांच्या वतीने शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त शासकीय मुद्रणालय कोल्हापूर येथील आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी आंबा, फणस, जांभूळ, रामफळ, सोनआपटा, गुलमोहर,आदी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी शासकीय मुद्रणालय येथील व्यवस्थापक प्रकाश कांबळे, जावेद आत्तार, राजदीप घोडके, रणजित फगरे,आदींनी शाहू महाराजांचे विचार व्यक्त करून शाहू चे कार्य त्यांची दूरदृष्टी या विषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी एडवोकेट विजयकुमार कदम, चंद्रकांत काटे, राजेंद्र सुतार, सागर पालवे, सुरेश सुस्वरे, सुभाष सुतार, सुनिल दळवी, प्रविन नाईक, रोहित भोपे, अर्जुन पाटील, दिपक शिर्के, मोमीन, अभि पाटील, प्रविन भोसले, संपत कांबळे, आदीसह विनर्स झेप स्पर्धा परिवारातील विद्यार्थी उपस्थित होते. आभार अनिल खोत यांनी मांडले.
विनर्स झेप यांच्या वतीने वृक्षारोपण संपन्न
|