बातम्या

स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे दादा यांना पुण्यतिथी दिनानिमित्त श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेत अभिवादन

Tribute paid to the late Shripatrao Bondre Dada


By nisha patil - 9/30/2026 4:06:41 PM
Share This News:



स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे दादा यांना पुण्यतिथी दिनानिमित्त श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेत अभिवादन

 कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री व श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन श्रीपतराव शंकरराव बोंद्रे दादा यांना 26 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त आज अभिवादन करण्यात आले.यानिमित्ताने मान्यवरांच्या हस्ते संस्था परिसरातील दादांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 

संस्थेचे चेअरमन मानसिंगरावजी बोंद्रे, नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, संचालक दिपक पोवार व सर्जेराव पाटील यांनी दादांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
   

शिवाजी विद्यापीठाचे माजी बीसीयुडी संचालक प्राचार्य डॉ.डी.आर.मोरे, शहाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ अतुल पातकर ,आयटीआयचे प्राचार्य श्री वागरे, साई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. पाटील, जवाहर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री पवार सर शशिकांत कसबेकर, इतर सर्व शाखांचे प्रमुख , संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री मनीष भोसले,  श्री विठ्ठल आंबले ,सर्व प्राध्यापक, शिक्षक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. 
   

श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातही दादांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त स्वच्छता मोहीम, ग्रंथ प्रदर्शन, भिंती पत्रक प्रदर्शन व विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
   

संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या सर्व उपक्रमांना मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात श्रीपतराव  बोंद्रे दादांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त शहाजी वार्ताच्या 29 व्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. श्रीपतराव बोंद्रे दादा : समाज सुधारक राजकारणी या विषयावर प्राचार्य डॉ आर के शानेदिवाण यांचे विशेष व्याख्यान संपन्न झाले. श्रीपतराव बोंद्रे दादांचा जीवनपट, दादांचे जीवन कार्य व त्यांची जडणघडण, त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.दादांचे विचार  प्रेरणादायी असून ते पुढे नेण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 
 

स्वागत, प्रस्ताविक ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पी.के.पाटील यांनी केले. आभार  डॉ. आर.डी.मांडणीकर यांनी मांनले. प्रबंधक रवींद्र भोसले,अधीक्षक मनीष भोसले, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी यावेळी उपस्थित होते. 
 

दादांच्या जीवन कार्यावरील भिंती पत्रक ,शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने संदर्भ ग्रंथ प्रदर्शन यावेळी संपन्न झाले. स्त्री व्यक्तिमत्व विकास समितीच्या वतीने विद्यार्थ्यांनी आणलेल्या ठेव गावाकडची या विशेष उपक्रमाचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शेती व शेतीपूरक उत्पादनांची यावेळी विक्री केली व कौशल्य विकासाचा अनुभव घेतला. डॉ. सरोज पाटील यांनी या उपक्रमाचे संयोजन केले.


स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे दादा यांना पुण्यतिथी दिनानिमित्त श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेत अभिवादन
Total Views: 12