बातम्या
व्यंकटराव शिक्षण संकुलात मध्ये 'मृत्युंजय' कार शिवाजीराव सावंत यांच्या पुण्यदिनानिमित्त प्रतिमेचे पूजन
By nisha patil - 9/18/2026 6:31:58 PM
Share This News:
व्यंकटराव शिक्षण संकुलात मध्ये 'मृत्युंजय' कार शिवाजीराव सावंत यांच्या पुण्यदिनानिमित्त प्रतिमेचे पूजन
*आजरा(हसन तकीलदार)-:. येथील व्यंकटराव शिक्षण संकुलात प्रशालेचे माजी विद्यार्थी मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या पुण्यदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संचालक सुधीर जाधव यांचे शुभ हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष कृष्णा पटेकर, सचिव अभिषेक शिंपी,संचालक सचिन शिंपी, प्राचार्य एस.एन.पाटील, महेश शिंपी, प्राध्यापक विकास सुतार, शिक्षकेतर कर्मचारी हवेश देसाई आदी शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सुधीर जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शिवाजीराव सावंत हे शिवाजीनगर येथील आपल्या निवासस्थानाजवळ लागूनच राहत असल्याने त्यांच्या जडणघडणीतील काही गोष्टी चर्चेच्या रूपातून सांगितल्या. उपाध्यक्ष कृष्णा पटेकर यांनीही शिवाजीराव सावंत आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी असताना त्यांच्यातील अपार उत्साह, नाटकातील सहभाग, कबड्डी मधील विशेष कौशल्य, तसेच लेखनातील उत्तरोत्तर होणारी प्रगती या शाळेने पाहिल्याचे सांगितले.त्यांनी लिहिलेल्या अनेक कादंबऱ्यांना अनेक पुरस्कार मिळाले पण मृत्युंजय कादंबरी ही अनेक भाषांमध्ये भाषांतरित होऊन जगभर पसरली.. आणि आपल्या व्यंकटराव हायस्कूलचे नाव साता समुद्रापार पोहोचले.
व्यंकटराव शिक्षण संकुलात मध्ये 'मृत्युंजय' कार शिवाजीराव सावंत यांच्या पुण्यदिनानिमित्त प्रतिमेचे पूजन
|