बातम्या
बिबट्या पकडणाऱ्या धाडसी वीरांचा सत्कार – कोल्हापुरात भीतीचा थरार संपला!
By nisha patil - 11/13/2025 3:24:47 PM
Share This News:
बिबट्या पकडणाऱ्या धाडसी वीरांचा सत्कार – कोल्हापुरात भीतीचा थरार संपला!
बिबट्या शहरात शिरल्याची बातमी समजताच संपूर्ण कोल्हापुरात भीतीचे सावट पसरले होते. नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. मात्र, वनविभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी जीवाची पर्वा न करता धाडसी कारवाई करत बिबट्याला अखेर जेरबंद केले. या शौर्यपूर्ण कार्याबद्दल या वीरांचा पोलिस प्रशासनाकडून सत्कार करण्यात येणार आहे.
बिबट्याने कृष्णा पाटील यांच्यावर अचानक हल्ला केला होता. परंतु त्यांच्या धैर्याने बिबट्या माघारी फिरला आणि मोठा अनर्थ टळला. बागेत काम करणाऱ्या माळीवरही त्याने झडप घातली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला असून संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, हल्ल्यात जखमी झालेले कृष्णात पाटील, ओकार काटकर, तुकाराम खोदाळ आणि बाळू हुंबे यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
वनविभाग आणि पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे कोल्हापुरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
बिबट्या पकडणाऱ्या धाडसी वीरांचा सत्कार – कोल्हापुरात भीतीचा थरार संपला!
|