बातम्या

18 व्या स्मृतीदिनानिमित्त राजारामबापू देसाई यांना आदरांजली

Tributes paid to Rajarambapu Desai on his 18th death anniversary


By nisha patil - 11/20/2025 3:26:53 PM
Share This News:



18 व्या स्मृतीदिनानिमित्त राजारामबापू देसाई यांना आदरांजली
 

आजरा(हसन तकीलदार):-स्व. राजारामबापू देसाई फाउंडेशन मार्फत राजारामबापू देसाई यांच्या 18व्या स्मृतिदिनानिमित्त आजरा येथील संघामध्ये फोटो पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्व. राजारामबापू देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
           

स्व. राजारामबापू देसाई हे सहकार क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व 1978साली कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून निवडून आले. त्यानंतर 1987मध्ये त्यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळली. तालुका खरेदी विक्री संघाला अडचणीतून बाहेर काढून संघाला संजीवनी देण्याचे काम राजाराबापूनी केले होते. अगदी शांत आणि संयमी नेतृत्वाने तालुक्याच्या राजकारणात तसेच सहकारात त्यांनी आपला ठसा उमटवून अमिट छाप सोडली होती.

केडीसीसी बँक, तालुका संघ,जनता बँक, आजरा साखर कारखाना, विकास सोसायटी, पतसंस्था यासारख्या संस्थांना त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. याबरोबरच गडहिंग्लज बाजार समितीचे सभापती पदही त्यांनी भूषविले होते. त्यांच्या पश्चात हसन मुश्रीफ यांचे समर्थक सुधीरभाऊ देसाई यांनी त्यांच्या राजकीय वारसाचा वसा घेत जिल्हापातळीपर्यंत  आपली छाप पाडली आहे. सुधीरभाऊंनी राजारामबापू फाउंडेशनची स्थापना करून त्यामार्फत सामाजिक कार्य सुरु केले आहे. आजही राजाराबापूंचे नाव आदराने घेतले जाते.
                 

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुधीरभाऊ देसाई, आजरा साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष देसाई,अल्बर्ट डिसोझा, तालुका संघांचे उपाध्यक्ष दौलतराव पाटील, साखर कारखाना संचालक उदयसिंह पोवार,एम. के. देसाई, अनिल फडके,संभाजीराव पाटील,, मधुकर यलगार, विठ्ठलराव देसाई, शेतकरी संघाचे मॅनेजर जनार्दन बामणे आदिजण उपस्थित होते.


18 व्या स्मृतीदिनानिमित्त राजारामबापू देसाई यांना आदरांजली
Total Views: 184