बातम्या
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांना पुण्यतिथी दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात अभिवादन
By nisha patil - 11/25/2026 3:46:09 PM
Share This News:
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्याप्रमाणे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करा : प्राचार्य डॉ. आर. के.शानेदिवाण
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांना पुण्यतिथी दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात अभिवादन
कोल्हापूर : देशाचे उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण केले. त्यांचे व इतर महापुरुषांचे विचार जतन करत समाजकारण, राजकारण करा असे आवाहन श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी केले.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आयोजित, आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांना आठवताना या विषयावरील विशेष व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
प्रारंभी यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्राचार्य डॉ.आर. के. शानेदिवाण म्हणाले देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचे मोठे योगदान आहे. 1942 च्या चलेजाव आंदोलनामध्ये त्यांना सक्त मजुरीची शिक्षाही भोगावे लागली. इंग्रज फौजदाराने पोटावर लाथ मारल्यामुळे वेणुताईंना आयुष्यभर निपुत्रिक राहावे लागले. स्वतंत्र्यासाठी यशवंतराव चव्हाण साहेब आणि वेणुताईंचाही मोठा त्याग आहे. स्वातंत्र्यानंतरही देशाचे उपपंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी देशाची आणि राज्याची चांगली बांधणी केली. विविध क्षेत्रात पाया भक्कम केला. त्यावरच आज विकासाची घोडदौड सुरू आहे. त्यांच्यासारखे 80 टक्के समाजकारण आणि 20% राजकारण करावे असे आवाहनही त्यांनी केले.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
भूगोल विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले. भूगोल विभाग प्रमुख डॉ. डी. एल. काशीद- पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची माहिती देऊन प्रस्ताविक केले. डॉ. ऐश्वर्या हिंगमिरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.शुभम पाटील यांनी आभार मानले.
यावेळी परीक्षा विभाग प्रमुख डॉ.के.एम.देसाई, डॉ.डी.के.वळवी,डॉ. ए. बी. बलुगडे,सर्व प्राध्यापक प्रशासकीय सहकारी उपस्थित होते.
शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांच्यावरील ग्रंथसंपदेचे यावेळी ग्रंथ प्रदर्शन संपन्न झाले.ग्रंथपाल डॉ.पांडुरंग पाटील, सहाय्यक ग्रंथपाल सौ. यु.यु.साळोखे यांनी संयोजन केले. प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावरील ग्रंथांचे वाचन केले.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांना पुण्यतिथी दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात अभिवादन
|