बातम्या
स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे दादा यांना शाहू शिक्षण संस्थेत पुण्यतिथी निमित्त अभिवादन
By nisha patil - 9/30/2025 2:38:06 PM
Share This News:
स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे दादा यांना शाहू शिक्षण संस्थेत पुण्यतिथी निमित्त अभिवादन
कोल्हापूर :श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन व महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री स्वर्गीय श्रीपतराव शंकरराव बोंद्रे (दादा) यांच्या 25 व्या. पुण्यतिथीनिमित्त शाहू शिक्षण संस्थेत दादांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. यावेळी संस्थेचे चेअरमन मा. मानसिंगरावजी बोंद्रे (दादा) गोकुळचे संचालक विश्वासराव पाटील (आबाजी) व संस्थेच्या सर्व शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते.
संस्थेच्या श्रीपतराव शंकराव बोंद्रे इंग्लिश मीडियम हायस्कूल,जवाहर हायस्कूल, श्री साई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय व अन्य शाखांमध्येही श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आयक्यूएसी व शिवाजी ग्रंथालय यांच्या वतीने श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्यावरील जीवन कार्यावर आधारित दादा आठवताना या विषयावर भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. डी एल काशीद पाटील यांचे व्याख्यान झाले. प्राचार्य डॉ आर के शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी होते. यावेळी दादांच्या जीवन कार्यावरील पोस्टर प्रदर्शन व ग्रंथांचे प्रदर्शन संपन्न झाले. स्वागत प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. पी.बी.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पी के पाटील यांनी केले. आभार शिवाजी रायजादे यांनी मांनले.
प्रबंधक रवींद्र भोसले, आयक्यूएसी समन्वयक डॉ.आर डी मांडणीकर, सह समन्वयक डॉ.ए. बी. बलुगडे,परीक्षा विभागप्रमुख डॉ. के एम देसाई, स्टाफ सेक्रेटरी डॉ. डी. के. वळवी, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी यावेळी उपस्थित होते.
या सर्व उपक्रमांना श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे दादा, नूतन प्रशासकीय अधिकारी मनीष भोसले, श्री विठ्ठल आंबले यांचे प्रोत्साहन मिळाले.
स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे दादा यांना शाहू शिक्षण संस्थेत पुण्यतिथी निमित्त अभिवादन
|