बातम्या
महात्मा फुले यांना पुण्यतिथी दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात अभिवादन
By nisha patil - 11/28/2026 6:08:40 PM
Share This News:
महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण आवश्यक : सौ.श्रुतिका शाहू काटकर
महात्मा फुले यांना पुण्यतिथी दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात अभिवादन
कोल्हापूर : महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना प्रशिक्षण आवश्यक आहे.त्यांचा कौशल्य विकास होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.श्रुतिका शाहू काटकर यांनी केले.दसरा चौक येथील शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी उपक्रमांतर्गत स्त्री सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी त्यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली . यावेळी त्या बोलत होत्या.स्त्री कालची आजची व उद्याची असा त्यांना विषय देण्यात आला होता.
कोल्हापूर जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक श्री शाहू काटकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के.शानेदिवाण, प्रबंध रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, आय क्यू एस सी समन्वयक डॉ.आर.डी.मांडणीकर, परीक्षा विभाग प्रमुख डॉ. के. एम.देसाई, सह समन्वयक डॉ.ए.बी.बलुगडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे प्रोत्साहन मिळाले. समाजशास्त्र विभाग, मानसशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला.
समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ के. एम. देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. स्त्रियांचे विविध प्रश्न,त्यांच्या जबाबदाऱ्या, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे महिलांसाठी चे विविध उपक्रम व आपण करत असलेले कार्य यावर श्रुतिका काटकर यांनी भाष्य केले. विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक यांच्या प्रश्नांनाना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
श्री शाहू काटकर यांनी दूध संस्था, मजूर संस्था, सहकारी बँका,पतसंस्था व इतर उपक्रमांच्या माध्यमातून करत असलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. स्त्री सक्षमीकरणासाठी कुटुंबाचे, समाजाचे, संस्थांचे पाठबळ आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वर्गीय पी.एन.पाटील साहेब यांना आदर्श मानून महिलांच्या विकासासाठी श्रुतिका काटकर कार्यरत असल्याचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा.पी पी भाटे यांनी केले. डॉ. विशाल कुरणे यांनी संयोजन केले. डॉ .ए.बी.बलुगडे यांनी आभार मानले.
महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त त्यांच्यावरील ग्रंथ संपदेचे ग्रंथ प्रदर्शन यावेळी शिवाजी ग्रंथालयात संपन्न झाले. विद्यार्थी, प्राध्यापक यांनी या ग्रंथ प्रदर्शनास भेट दिली.
महात्मा फुले यांना पुण्यतिथी दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात अभिवादन
|