बातम्या
तुळसमध्ये २१ जून रोजी भव्य सकल हिंदू संमेलन..
By nisha patil - 6/19/2026 8:22:11 PM
Share This News:
तुळसमध्ये २१ जून रोजी भव्य सकल हिंदू संमेलन..
सिंधुदुर्ग :✒️शुभम गवस तुळस येथे रविवार, २१ जून २०२६ रोजी सायंकाळी ३.३० ते ६ या वेळेत उत्सव मंगल कार्यालयात सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तुळस, पाल, अणसुर, पेंडूर, मातोंड, होडावडे आणि वजराट या सात गावांच्या संयुक्त पुढाकारातून हा कार्यक्रम होणार आहे.
हिंदू समाजात एकता, संघटन, धर्मजागृती आणि संस्कृती संवर्धनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमात ज्येष्ठ कीर्तनकार सुबोध मराठे, गणेश गोविंद (राजू) जोशी गुरुजी, हिंदू जनजागृती समितीचे गोवा राज्य संघटक सत्यविजय नाईक तसेच अमित गोपाळ नाईक उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
समाजातील सर्व घटकांमध्ये संवाद वाढावा, युवकांमध्ये संस्कारांची जपणूक व्हावी आणि हिंदू समाज अधिक संघटित व्हावा, या हेतूने आयोजित या संमेलनास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तुळसमध्ये २१ जून रोजी भव्य सकल हिंदू संमेलन..
|