बातम्या

गोकुळ निवडणुकीत छाननीनंतर ट्विस्ट! २४० अर्ज वैध, ६० उमेदवारी अर्ज बाद

Twist after scrutiny in Gokul election


By nisha patil - 9/24/2026 3:34:30 PM
Share This News:



गोकुळ निवडणुकीत छाननीनंतर ट्विस्ट! २४० अर्ज वैध, ६० उमेदवारी अर्ज बाद


कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २१ आणि २२ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर २३ सप्टेंबर रोजी छाननी करण्यात आली. छाननीनंतर विविध प्रवर्गांमध्ये एकूण २४० उमेदवारांचे अर्ज वैध, तर ६० अर्ज अवैध ठरले आहेत. सर्वसाधारण प्रवर्गात १४६ अर्ज वैध झाले असून १६ अर्ज अवैध ठरले. महिला राखीव प्रवर्गात ३४ अर्ज वैध, तर २६ अर्ज अवैध ठरले आहेत. इतर मागास प्रवर्गात ३७ अर्ज वैध झाले आहेत. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात ९ अर्ज वैध, तर ४ अर्ज अवैध ठरले. तसेच विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गात १४ अर्ज वैध आणि ४ अर्ज अवैध ठरले आहेत.

अवैध अर्जांमध्ये प्रामुख्याने गोकुळच्या उपविधींशी संबंधित तांत्रिक बाबींचा आधार घेण्यात आला आहे. संबंधित उमेदवारांना अवैध ठरविण्याचे आदेश वैयक्तिकरित्या पाठविण्यात आल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली. दरम्यान, आजपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत माघारीची मुदत आहे. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.

गोकुळ निवडणुकीसाठी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान, तर १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये पार पडणार आहे.


गोकुळ निवडणुकीत छाननीनंतर ट्विस्ट! २४० अर्ज वैध, ६० उमेदवारी अर्ज बाद
Total Views: 10