बातम्या

म्हशींच्या चोरीप्रकरणी दोघांना केली अटक

Two arrested in buffalo theft case


By nisha patil - 4/9/2026 3:16:42 PM
Share This News:



म्हशींच्या चोरीप्रकरणी दोघांना केली अटक

*आजरा पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाची कारवाई

*आजरा(हसन तकीलदार):  तालुक्यासह परिसरामध्ये घरफोड्या आणि म्हशी चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे आजरा पोलिसासमोर आव्हान उभे ठाकले होते.पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करीत सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले आणि या तपास कामात पोलीस यंत्रणेला यश आले.
तालुक्यात दोन ठिकाणाहून १ लाख ४५ हजारांच्या दोन म्हशींची चोरी करणाऱ्या रेहान इसाक मुल्ला (वय १९) व हुजेफा जमीर मुराद (वय २१) दोघेही रा. वाडा गल्ली, आजरा यांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई आजरा पोलिस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण
शाखेच्या पथकाने गुरुवारी केली.
         

तालुक्यातील आजरा पोळगाव मार्गावरील करपादेवीजवळील संदीप नाईक यांच्या शेतातील घरातून ३१ ऑगस्टच्या रात्री म्हैस चोरीला गेली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली दयानंद बेनके, समीर कांबळे, साजिद शिकलगार, सूर्यकांत सुतार,वैभव गवळी,दीपक मन्यागोळ यांच्या पथकाने सीसीटीव्ही
फुटेजची तपासणी केली.

 

दरम्यान गुप्त माहितीवरून रेहान मुल्ला व हुजेफा मुराद या दोघांना ताब्यात घेत  दोघांनाही पोलिसी खाक्या दाखविताच संदीप नाईक यांच्या म्हशींबरोबर ९ ऑगस्टला आवंडी वसाहतमधून मुऱ्हा जातीच्या म्हशीची चोरी केल्याचे दोघांनी कबूल केले. दोघांकडून दोन म्हशी ताब्यात घेतल्या असून, पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार दयानंद बेनके करीत आहेत.


म्हशींच्या चोरीप्रकरणी दोघांना केली अटक
Total Views: 913