बातम्या

 कोल्हापुरात दोन गावठी पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त; मोक्का संशयित पोलिसांच्या जाळ्यात!

Two country made pistols and four live cartridges seized


By nisha patil - 10/26/2026 7:29:38 PM
Share This News:



 कोल्हापुरात दोन गावठी पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त; मोक्का संशयित पोलिसांच्या जाळ्यात!

कोल्हापुरात अवैध अग्निशस्त्रांविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. दोन गावठी पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली असून, मोक्का गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आलेल्या संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे.

निलेश उर्फ महादेव दिलीप काळे, वय ४१, असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे. तो कोल्हापुरातील यादवनगर, राजारामपुरी परिसरातील रहिवासी आहे.२६ ऑक्टोबर रोजी उचगाव ते गडमुडशिंगी जाणाऱ्या रस्त्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचला. यावेळी शस्त्रांची विक्री करण्यासाठी आलेल्या निलेश काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुले, चार जिवंत राऊंड आणि एक मोबाईल फोन असा एकूण एक लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास गांधीनगर पोलीस करत आहेत.पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.


 कोल्हापुरात दोन गावठी पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त; मोक्का संशयित पोलिसांच्या जाळ्यात!
Total Views: 15