बातम्या
'स्वरोजगारातून सक्षमीकरणा'विषयी विद्यापीठात १४ पासून दोनदिवसीय कार्यशाळा
By nisha patil - 11/11/2025 6:04:41 PM
Share This News:
'स्वरोजगारातून सक्षमीकरणा'विषयी विद्यापीठात १४ पासून दोनदिवसीय कार्यशाळा
कोल्हापूर, दि. ११ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठाची यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास प्रशाला, बेटी बचाव अभियान आणि कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने ‘स्वरोजगारातून सक्षमीकरण’ या विषयावर येत्या १४ नोव्हेंबरपासून दोनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास प्रशालेत कार्यशाळा होईल.
ग्रामीण भागातील महिलांना स्वरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन करणे हे कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे. कार्यशाळेत रोटरी क्लब ऑफ एक्झिक्युटिव्ह्ज, इचलकरंजी या संस्थेच्या सहयोगाने विविध प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांमध्ये उद्योजकता, कौशल्य विकास आणि आत्मनिर्भरतेचा दृष्टिकोन निर्माण करण्यास कार्यशाळा निश्चित उपयुक्त ठरेल, असा विश्वास संचालक डॉ. नितीन माळी यांनी व्यक्त केला.
'स्वरोजगारातून सक्षमीकरणा'विषयी विद्यापीठात १४ पासून दोनदिवसीय कार्यशाळा
|