बातम्या

कोल्हापूरमध्ये दोन घरफोड्या करणारे आरोपी जाळ्यात; ५३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Two house burglaries in Kolhapur caught


By nisha patil - 12/12/2025 12:47:04 PM
Share This News:



कोल्हापूर :- जिल्ह्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांना आळा बसावा यासाठी पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात यश आले आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल ५३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक झालेल्यांची नावे प्रल्हाद विठ्ठल कवठेकर (रा. तारदाळ, हातकणंगले) आणि उदय माने (रा. यड्राव) अशी आहेत. दोघांवर यापूर्वीही घरफोडीचे गुन्हे दाखल असून ते सराईतपणे दागिने चोरी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस पथकाने केलेल्या छाप्यात आरोपींकडून ४३ तोळे सोन्याचे दागिने, चांदीसह एकूण ₹५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईमुळे तारदाळ, शहापूर, हातकणंगले, कुरुंदवाड तसेच सांगली ग्रामीण भागातील मिळून एकूण आठ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

अलीकडच्या काळात भरदिवसा घरफोडीचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र या मोठ्या कारवाईमुळे पोलिसांच्या तपासाला मोठे यश मिळाले असून पुढील चौकशीत आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


कोल्हापूरमध्ये दोन घरफोड्या करणारे आरोपी जाळ्यात; ५३ लाखांचा मुद्देमाल जप्त
Total Views: 34