ताज्या बातम्या
आजऱ्याजवळील अपघातात दोन ठार,एक जखमी
By nisha patil - 12/25/2025 11:31:34 AM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार ):- आजरा जवळील सुलगांव फाट्यावर ओमणी चारचाकी व आयशर टेंम्पोचा अपघात होवून गडहिंग्लजचे दोन भाजी व्यापारी ठार झाले आहेत तर एक महिला जखमी झाली आहे.ठार झालेल्या मध्ये चालक व एका पुरुषाचा समावेश आहे.हा अपघात रात्री दीडच्या सुमारास घडला आहे.
मनिष श्रीकांत सोलापुरे रा. गडहिंग्लज (चालक),गीता कृष्णा कांबळे (रा गडहिंग्लज) व कृष्णा कलाप्पा कांबळे (रा गडहिंग्लज) हे काल सावंतवाडीचा भाजीपाला व्यापार करुन गडहिंग्लजकडे परत जात होते.रात्री दीडच्या सुमारास आजऱ्याजवळील सुलगांव फाट्याजवळ ओमणी चालक याचा गाडी चालवत असताना डोळ्यावर झाप आली.
याच दरम्यान समोरुन आयशर मालवाहू ट्रक येत होता.ओमणी चूकीच्या बाजूला जात आयशरवर आदळली यामध्ये कृष्णा कलाप्पा कांबळे हे जागीच ठार झाले तर चालक मनिष सोलापूरे व गीता कांबळे जखमी झाले. दोघानाही उपचारासाठी गडहिंग्लज नंतर कोल्हापूर येथे नेण्यात आले मात्र यातील चालकाचाही मृत्यू झाला आहे.गीता कांबळे यांच्यावर उपचार सुरू आहेत.पोलीस तपासी अंमलदार येलकर अधिक तपास करीत आहेत.
आजऱ्याजवळील अपघातात दोन ठार,एक जखमी
|