बातम्या
*ऊसाच्या ट्रॉलीचा हुक तुटून झालेल्या अपघातात दोघे मोटरसायकलस्वार ठार
By nisha patil - 11/20/2026 8:22:28 PM
Share This News:
*ऊसाच्या ट्रॉलीचा हुक तुटून झालेल्या अपघातात दोघे मोटरसायकलस्वार ठार
*धामणे ता. आजरा येथील घटना *आजरा(हसन तकीलदार):-धामणे ता. आजरा येथे धामणे गावच्या अलीकडे असलेले बेलेटिक्की येथील डीपी समोर ट्रॅक्टर क्र. KA. 23.TC 7048 या ट्रॅक्टरच्या पाठीमागून मोटरसायकल क्र. MH. 09.CT. 6053 वरून येणाऱ्या महादेव दिनकर करवळ (वय वर्षे 49) रा.सोनारवाडी ता. भुदरगड व बचाराम शिवाजी सुतार (वय वर्षे 65)रा. मिणचे खुर्द ता. भुदरगड यांच्या अंगावर ट्रॉलीचा हुक तुटून ऊस भरलेली ट्रॉली गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत संदीप नारायण पोवार यांचे फिर्यादीवरून आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आजरा पोलीसस्टेशन कडून मिळालेली माहिती अशी की, दि. 19/11/2026 रोजी रात्री 10:30 वाजता धामणे गावच्या अलीकडे बेलेटीक्की येथील डीपीसमोर अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील महिंद्रा अर्जुन कंपनीचा ट्रॅक्टर क्र. KA.23.TC. 7048 हा ट्रॉली क्र. KA. 23.TD. 7194 मधून ऊस भरून घेऊन धामणे गावच्या दिशेने चालवीत घेऊन जात असताना त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हा रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने व बेदरकारपणे चालवीलेने ट्रॉलीचा हुक तुटून ट्रॉली वेगाने पाठीमागे जात असताना पाठीमागून येणारी मोटारसायकल एच एफ डिलक्स MH. 09.CT. 6053 वरील फिर्यादी यांचे दाजी महादेव दिनकर करवळ व पाठीमागे बसलेले त्यांचे मित्र बचाराम शिवाजी सुतार यांना ट्रॉली धडकून यांचे अंगावर ट्रॉली जाऊन अपघात झालेने ते गंभीर जखमी होऊन त्यांचे मृत्यूस कारणीभूत झाल्याने तसेच अपघाताची पोलीसांना माहिती न देता जखमीना कोणतीही वैद्यकीय मदत न करता पळून गेल्याने ट्रॅक्टर क्र.KA. 23.TC. 7048 वरील अज्ञात चालकाविरुद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करून तो न्यायप्रविष्ठ केला आहे. सदर घटनेचा सखोल तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे करीत आहेत.
*मृत्युमुखी पडलेले दोघेही बेलेवाडी येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे कर्मचारी असल्याचे समजते . सकाळी चार बाराची शिफ्ट होती.थंडीमुळे ते रात्रीच मुक्कामाला निघाले होते.ट्रॅक्टर चालक फरार असल्याने अज्ञात ट्रॅक्टरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
*ऊसाच्या ट्रॉलीचा हुक तुटून झालेल्या अपघातात दोघे मोटरसायकलस्वार ठार
|