बातम्या

UNESCO finally selected 12 forts....युनेस्को' ने श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ गड-किल्ले हे जागतिक वारसा दर्जासाठी अखेर आज निवडले

UNESCO finally selected 12 forts


By nisha patil - 11/7/2025 9:47:17 PM
Share This News:



युनेस्को' ने श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ गड-किल्ले हे जागतिक वारसा दर्जासाठी अखेर आज निवडले
 

पन्हाळा प्रतिनिधी , शहाबाज मुजावर, मराठा लष्करी स्थापत्य शृंखला अंतर्गत पन्हाळा किल्ला या नामांकित स्मारक आज मान्यता देण्यात आली आहे.'युनेस्को' ने श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ गड-किल्ले हे जागतिक वारसा दर्जासाठी  मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पने खाली नामांकित केले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्थेच्या (यूनेस्को) पॅरिसमध्ये सुरू असलेल्या बैठकीकडे भारतातील इतिहासतज्ज्ञ व पुरातत्त्ववेत्त्यांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत जागतिक वारसा यादीत समाविष्ट केल्या जाणाऱ्या नवीन स्थळांची निवड आज झाली आहे.

भारताच्या वतीने २०२४-२५ सालासाठी ‘‘मराठा लष्करी वारसास्थळे’’ ही नोंदणी सुचवण्यात आली असून, या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले पन्हाळा गडाचा समावेश झाला  आहे. देशातील एकूण बारा किल्ल्यांचा यामध्ये समावेश झाला आहे.

त्यात महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूचा जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. 12 किल्ल्यांपैकी 11 महाराष्ट्रातील आणि  तामिळनाडूचा एक आहे.  'मराठा मिलिटरी लँडस्केप्स' या शीर्षकाखाली नामांकन पाठवण्यात आले होते, ज्यात मराठा राज्यकर्त्यांनी कल्पना केलेली असाधारण तटबंदी आणि लष्करी व्यवस्था दर्शवली होती.  

12 किल्ले पुढीलप्रमाणे आहेत: 
1)साल्हेर किल्ला, 2)शिवनेरी किल्ला, 3)लोहगड, 4)खांदेरी किल्ला, 5)रायगड,6) राजगड, 7)प्रतापगड, 8)सुवर्णदुर्ग, 9)पन्हाळा किल्ला, 10)विजय दुर्ग आणि महाराष्ट्रातील11) सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूमधील 12)जिंजी किल्ला.


UNESCO finally selected 12 forts....युनेस्को' ने श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ गड-किल्ले हे जागतिक वारसा दर्जासाठी अखेर आज निवडले
Total Views: 384