विशेष बातम्या
कोल्हापुरात पुन्हा युपी-बिहारी दादागिरी; मनसेचा इशारा
By nisha patil - 11/8/2025 3:28:31 PM
Share This News:
कोल्हापुरात पुन्हा युपी-बिहारी दादागिरी; मनसेचा इशारा
भाजी मार्केट अध्यक्षावर हल्ला; मनसेकडून ‘स्टाईल’मध्ये प्रत्युत्तराची तयारी
कोल्हापुरातील मंगळवार पेठ भाजी मार्केटमध्ये स्थानिक मराठी भाजी मार्केट अध्यक्षांवर बेसावध हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आले. हा हल्ला युपी-बिहारी व्यक्तीकडून झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने केला आहे.
यापूर्वीही अशा दादागिरीविरोधात मनसेने कारवाई करून ती थांबवली होती, ज्यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीन महिने तुरुंगवास भोगला होता. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजू जाधव यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत, “आता पुन्हा एकदा मनसे स्टाईलने दणका देणारच,” असा इशारा दिला आहे.
कोल्हापुरात पुन्हा युपी-बिहारी दादागिरी; मनसेचा इशारा
|