ताज्या बातम्या
जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर उबाठाची बैठक संपन्न
By nisha patil - 1/15/2026 4:58:42 PM
Share This News:
*आजरा (हसन तकीलदार)*:-जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आजरा तालुका पक्षाची बैठक जिल्हाप्रमुख प्रा.सुनील शिंत्रे व उपजिल्हाप्रमुख संभाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली या बैठकीत कार्यकर्त्यांनी घरची भाकरी खाऊन निष्ठावंत शिवसैनिकाला पंचायत समिती व जिल्हा परिषदेत पाठवू असा निर्धार केला तसेच लोकसभा व विधानसभेत महाविकास आघाडी म्हणून शिवसैनिकांनी काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या उमेदवारांचा प्रामाणिक व कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रचार केला यामुळे या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी गट यांनी शिवसेनेला सन्मानजनक जागा द्याव्यात. गेली अनेक वर्ष शिवसेना हा पक्ष रस्त्यावर उतरून सर्वसामान्य जनतेची कामे करीत आहे. तालुक्यातील अनेक प्रश्न सत्ता नसताना देखील जनआंदोलन,मोर्चे काढून लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम आपण केलेली आहेत. सध्या देशात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे.त्या सरकारच्या विरोधात ग्रामीण जनतेत रोष आहे.
भाजपच्या हुकूमशाहीला जनता कंटाळलेली आहे.पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर निवडणुका जिंकू पाहणाऱ्या भाजपला या निवडणुकीत त्यांची जागा दाखवूया असा निश्चय शिवसैनिकांनी यावेळी केला. पेरणोली जिल्हा परिषदेसाठी युवराज पोवार, दिनेश कांबळे,पेरणोली तर पंचायत समितीसाठी संगीता माडभगत, छाया आढाव
वाटंगी पंचायत समितीसाठी विश्वास किल्लेदार,कृष्णा पाटील
उत्तूर जिल्हा परिषदसाठी संजय येसादे,सागर वाघरे
उत्तुर पंचायत समितीसाठी आनंदा येसणे,रोहित डावरे,अशी नावे सुचवण्यात आली आहेत.भादवण साठी अजून निर्णय बाकी आहे
यावेळी सुनील डोंगरे, समीरभाई चांद,कृष्णा पाटील, जयसिंग पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली तालुकाप्रमुख युवराज पवार यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी उपतालुकाप्रमुख शिवाजी आढाव, विश्वास किल्लेदार,विलास जोशीलकर, महादेव सुतार, महादेव होडगे, अमित गुरव,सुयश पाटील, लक्ष्मण परीट,रवी खोराटे,भिकाजी पाटील,राहू पाटील, महिला आघाडीच्या सुमन देसाई,उमेश डेळेकर,तानाजी डोंगरे,भाऊ निवळे, संजयभाई सावंत, बाळू परीट, लक्ष्मण माडभगत,रवी गुडुळकर, बिलालभाई लतीफ यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर उबाठाची बैठक संपन्न
|